Will Congress and Goa Forward Party play an important role in Goa Assembly session pad96 Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीची बोलणी कोलमडली

काँग्रेस-गोवा फॉरवर्डची फारकत, विरोधकांच्या निरुत्साहामुळे गाजणार अधिवेशन

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा फॉरवर्ड पक्षाची (Goa Forward) काँग्रेसबरोबर (Congress) चालू असलेली युतीची बोलणी संपूर्णतः कोलमडल्याचा प्रत्यय सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात (Goa Assembly Election) येणार असून, अजूनपर्यंत समन्वयाने अधिवेशनापुरते तरी काम करणाऱ्या या पक्षांनी एकमेकांशी फारकत घेतली आहे.

मला यापुढे काँग्रेसशी काहीही कर्तव्य नाही. मी त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यास उत्सुक नाही, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी आज ‘गोमन्तक’ला दिली. विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन केवळ सोपस्कार म्हणून सोमवारपासून सुरू होत असले, तरी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड त्यात काही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे का? याबद्दल राजकीय निरीक्षकांमध्येही संशय आहे. यापूर्वीच्या अधिवेशनांमध्ये दोन्ही पक्षांनी समन्वयाने काम करून सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणले होते.

चालू विधानसभेची कारकीर्द संपायला अद्याप तीन महिने बाकी असल्याने एक अधिवेशन सोपस्कार म्हणून तरी घ्यावे लागते. निवडणुका निकट आल्यामुळे तरी विधानसभेत विरोधी पक्षांनी सक्षम कामगिरी बजावावी, अशी जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने लुईझिन फालेरो यांनी तृणमूलची कास धरल्यामुळे काँग्रेस पक्षाचे बलाबल पाचवरून एकाने घटले आहे. शिवाय रवी नाईक यांचाही पवित्रा माहीत नसल्यामुळे काँग्रेस पक्षाचे खरे बलाबल गोवा फॉरवर्डएवढेच प्रत्यक्षरीत्या तीन बनले आहे.

दुसऱ्या बाजूला गोवा फॉरवर्डसुद्धा आमदारांमध्ये समन्वय नसल्याने भरकटल्यासारखा झाला आहे. या पक्षाचे दोन आमदार मूळ पक्षात राहणार का? याबद्दल संशय आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडल्यासारखे आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे शेवटचे अधिवेशन गाजवतील, याबद्दल राजकीय निरीक्षकांना संशय नाही.

सोमवारपासून जे दोन दिवसांचे अधिवेशन होणार तो केवळ एक सोपस्कारच असणार. या अधिवेशनात मागच्या अधिवेशनातील प्रश्न विचारात घेतले जाणार आहेत. त्यामुळे इतर कामकाजाला वेळ मिळेल, असे वाटत नाही. तरीही काही विषय चर्चेत आल्यास आम्ही एकजुटीने त्याला सामोरे जाऊ. काँग्रेसचे चारही आमदार एकसंधपणे काम करू.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

SCROLL FOR NEXT