Rent-a-Bike/Car Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Rent-a-Bike/Car Accident: रेंट-अ-बाईक/कारचा अपघात झाल्यास पर्यटक अन् वाहन मालकाला होणार अटक; मुख्यमंत्र्यांची माहिती

भविष्यात वाहतूक नियमात सरकार मोठे बदल करणार

Kavya Powar

Rent-a-Bike/Car Accident in Goa: राज्यात येणारे पर्यटक फिरण्यासाठी रेंट-अ-बाईक किंवा कार भाड्याने घेतात. अनेकदा पर्यटक मद्य पिऊन वाहन चालवत असल्यामुळे जीवघेणे अपघात घडल्याचे समोर आले आहे.

पर्यटक राज्यातील वाहतुकीचे नियम पाळत नसून पोलीस आणि सरकारला जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून मुख्यमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

रेंट-अ-बाईक/कारचे वाढते अपघात लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, पर्यटकांनी वाहने चालवताना वाहतूक विभागाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. असे न केल्यास आणि यामुळे जीवघेणा अपघात झाल्यास रेंट-अ-बाईक/कारचा मालक आणि पर्यटक चालकाला अटक करण्यात येणार आहे.

भविष्यात वाहतूक नियमात सरकार मोठे बदल करणार आहे. त्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांना हे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT