Gaur Attack In Sanguem Goa Dainik Gomantak
गोवा

Bison Attack: गव्याच्या धडकेत तरुण गंभीर, रुग्णवाहिका तासभर पोचलीच नाही; ठोस उपाय योजना करण्याची स्थानिकांची मागणी

Gaur Attack In Sanguem Goa: मयूर महेश नाईक हा तरुण कामावर जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास वालकिणी-सांगे येथे त्याला गव्याने जोरदार धडक दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे : सांगे भागात रानटी जनावरांचा उपद्रव हा नित्याचाच भाग बनला आहे. सकाळी विळीयण-भाटी येथील मयूर महेश नाईक हा तरुण कामावर जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास वालकिणी-सांगे येथे त्याला गव्याने जोरदार धडक दिली.

यात तो गंभीररित्या जखमी झाला. जखमी मयूरला प्रथम सांगे आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डोके आणि कानातून रक्तस्राव होऊ लागल्याने त्याला जिल्हा इस्पितळात नेण्याची सूचना करण्यात आली.

मात्र, रुग्णवाहिकेची एक तास प्रतीक्षा करावी लागली. नंतर दुसऱ्या ठिकाणच्या रुग्णवाहिकेने त्याला मडगावला पाठविण्यात आले. मयूरचे वडील महेश नाईक म्हणाले, की रानटी जनावरे दिवस-रात्र भर रस्त्यांवर फिरत असल्याने दुचाकीचालकांना अपघात होत आहेत. रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे.

वन खात्याने खोदलेल्या खंदकांवरून ही जनावरे सहज उड्या मारून रस्त्यावर येतात, असे ते म्हणाले. यापूर्वीही विळीयण-सांगे भागात रानटी जनावरांच्या हल्ल्यात महादेव नाईक या युवकाचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT