Omkar Elephant In Goa Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: ‘ओंकार’ हत्तीची रवानगी होणार गडचिरोलीत! विश्वजीत राणेंची कर्नाटकच्या वनमंत्र्यांशी चर्चा; 2 दिवसांत येणार पथक

Elephant In Goa: गोव्यातून महाराष्ट्रात येत बागायती व पिकांची हानी करणारा ‘ओंकार’ नामक रानटी हत्तीला गडचिरोली येथील हत्ती तळावर पाठवण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातून महाराष्ट्रात येत बागायती व पिकांची हानी करणारा ‘ओंकार’ नामक रानटी हत्तीला गडचिरोली येथील हत्ती तळावर पाठवण्यात येणार आहे. त्याला पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे व हत्तींचे पथक कर्नाटक सरकार येत्या दोन दिवसांत पाठवणार आहे.

राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक रमेशकुमार यांनी दै. ‘गोमन्तक’ला सांगितले, की राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आज बंगळूर येथे कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांची मंत्रालयात भेट घेतली. तेथे झालेल्या चर्चेनुसार येत्या १४ दिवसांत ‘ओंकार’ला पकडून सुरक्षित अधिवासात नेण्याचे नक्की करण्यात आले आहे. या बैठकीवेळी राज्याचे मुख्य वन संरक्षक कमल दत्ता हेही उपस्थित होते.

राणे यांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये मानव-हत्ती संघर्ष रोखण्यासाठी त्रिपक्षीय करार करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. हत्तींच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. या संघर्षावर सामूहिक पातळीवर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. तीन राज्यांच्या समन्वयातून केवळ वन्यजीवांचेच नाही, तर नागरिकांचेही रक्षण होईल.

बंगळूरच्या बैठकीत विशेषतः ‘ओंकार’ नावाचा हत्ती, जो अलीकडे महाराष्ट्रातून गोव्यात दाखल झाला असून सातत्याने पिकांची नासधूस करत आहे, यावर तातडीने निर्णय घेण्यात आला. राणे यांनी स्पष्ट केले की, “ओंकार हत्तीला पुढील १४ दिवसांत कर्नाटकातील शिबिरात स्थलांतरित करून त्याला आवश्यक ते वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्यांमध्ये सहकार्याची ही भावना वन्यजीव संवर्धनाबरोबरच मानव-वन्यजीव सहअस्तित्वासाठी महत्त्वाची आहे. हा उपक्रम भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी एक आदर्श ठरेल, असेही राणे यांनी नमूद केले आहे.

हत्ती हाताळण्याचा कर्नाटककडे अनुभव

रमेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी याबाबत महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांना पत्रे लिहिली आहेत. महाराष्ट्राने हत्तीला पकडल्यानंतर गडचिरोली येथील हत्ती तळावर त्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. कर्नाटकने माहूत आणि प्रशिक्षित हत्ती तातडीने पाठवण्याचे ठरवले आहे. त्यांच्याकडे सहा हजार रानटी हत्ती असल्याने त्यांना हत्ती हाताळण्याचा अनुभव आहे. गोव्याकडे तसा अनुभव नसल्याने त्यांच्याकडे ही मदत मागण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tamil Yeoman Butterfly: गोव्यात बहुतांश देवरायांमध्ये आढळणारा 'खष्ट' वृक्ष, त्यावर दिसणारी 'तमिळ येओमन’ फुलपाखरे

Goa Roads: "रस्त्यावर खड्डा दिसला की फोन करा, 24 तासांत दुरुस्त करतो", मंत्री कामतांनी दिली गोवेकरांना Guarantee

Shivaji Maharaj: छ. शिवाजी महाराजांनी आधी टेकड्या जिंकल्या, तटबंदीवर तोफांचा मारा केला; वेल्लोर जिंकला! दक्षिण दिग्विजयाची कथा

Vasco: विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू! वॉटर हिटरचा शॉक बसल्याची शक्यता; मांगोरहिल येथील घटना

Horoscope: भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये, नवरात्रीचा काळा तुमच्यासाठी कसा असेल? वाचा सविस्तर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT