Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

'ओंकार'चा मोपा-कडशी परिसरात धुमाकूळ सुरूच; हत्तीचा कायमचा बंदोबस्त करा,वन महामंडळाने लक्ष द्यावे; उगवेवासीयांची मागणी

Omkar Elephant Update: ओंकार हत्ती वारंवार कडशी-मोपा परिसरात येऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करत असल्याने आता या हत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उगवेवासीयांनी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: ओंकार हत्ती वारंवार कडशी-मोपा परिसरात येऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करत असल्याने आता या हत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उगवेवासीयांनी श्री देवी माऊली मंदिरात शनिवारी घेतलेल्या बैठकीत केली.

मोपा सरपंच सुबोध महाले यांनी सांगितले,की उगवेवासीयांची महत्त्वाची बैठक झाली.या बैठकीत सरकारने या ओंकार हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, यासाठी वन महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

वन अधिकारी आणि पथकाने ओंकार हत्तीला सातहून अधिक वेळा महाराष्ट्र हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील वन अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचे योग्य सहकार्य मिळत नसल्याने ते ‘ओंकार’ला हाकलून देत असतात. आता वन महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे यांनी यात लक्ष घालून या ‘ओंकार’चा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी उगवेवासीयांनी बैठकीत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली.

तिळारी (महाराष्ट्र) ते पेडणे (गोवा) या सीमेवर ‘ओंकार’ हत्ती अधूनमधून गावांमध्ये व शेतांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत आहे. काजू, माड, पोफळी व इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांत भीती पसरली आहे.

हत्तीला पकडून सुरक्षित जंगलात स्थलांतर करावे. प्रशिक्षित पथक नेमावे. सीमाभागात कायमस्वरूपी संरक्षण यंत्रणा नेमावी. जर वेळेत उपाययोजना झाली नाही, तर हा हत्ती थेट मानवी जीवितावर बेतू शकतो, अशी भीती उदय महाले यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT