elephant Goa news Dainik Gomantak
गोवा

मंत्र्यांच्या चर्चा,'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ! सलग तिसऱ्या दिवशी शेतात ठिय्या; वनखातं काय करतंय? शेतकऱ्यांचा सवाल

Pernem farmers crop damage: वन विभागाचे अधिकारी त्याला हुकलावून लावण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना यश मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले

Akshata Chhatre

पेडणे: महाराष्ट्र-सिंधुदुर्ग सीमेवरून आलेल्या 'ओंकार' नावाच्या हत्तीने पेडणे तालुक्यातील कडशी, मोपा, तोरसे, आणि तांबोसे या भागात धुमाकूळ घातला आहे. गेले काही दिवस हा हत्ती बागायती आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. वन विभागाचे अधिकारी त्याला हुकलावून लावण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना यश मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तीन-तीन तास ठिय्या

एकीकडे वनमंत्री विश्वजीत राणे हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून हत्तीला परत पाठवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. पण दुसरीकडे, हा हत्ती सलग तिसऱ्या दिवशीही तांबोसे गावात शेतीची नासधूस करतोय. ज्या ठिकाणी तो शेतीचे नुकसान करतो, त्याच ठिकाणी तो तीन-तीन तास ठिय्या मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे.

या हत्तीला तातडीने कर्नाटक किंवा महाराष्ट्रात परत पाठवावे

गेल्या तीन दिवसांपासून हा हत्ती याच परिसरात ठाण मांडून बसलेला असतानाही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या हत्तीला तातडीने कर्नाटक किंवा महाराष्ट्रात परत पाठवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वन विभागाने नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन दिले असले तरी, भरपाई मिळायला बराच वेळ लागेल आणि तोपर्यंत हा हत्ती शेतीचे आणखी नुकसान करत राहील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navratri 2025 Wishes in Marathi: सण देवीचा, उत्सव भक्तीचा... नवरात्रीनिमित्त WhatsApp, Facebook च्या माध्यमातून पाठवा 'या' खास शुभेच्छा

Navratri 2025: नवरात्रीचा उपवास करत असाल, तर 'या' चुका चुकूनही करू नका; वाचा व्रताचे कठोर नियम

Viral Video: अजब-गजब ड्रामा! होर्डिंगवर झोपलेल्या पठ्ठ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ; नेटकरी म्हणाले...

Goa Crime: मद्यप्राशन करुन चाकूने केले वार, बायणा येथे 64 वर्षीय महिलेची हत्या; आरोपी अटकेत

Surya Grahan Horoscope: सूर्यग्रहण आणि शनीची दृष्टी; 'या' राशींसाठी वरदान ठरेल, पण काही राशींना सावध राहावं लागेल

SCROLL FOR NEXT