Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोलीत गव्यांचा धुमाकूळ! बागायती पिकांचं मोठं नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Bison In Bicholim: डिचोली शहरातील लाखेरे भागात गव्यांचा संचार वाढल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Sameer Amunekar

डिचोली: डिचोली शहरातील लाखेरे भागात गव्यांचा संचार वाढल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात वारंवार गव्यांचा वावर दिसून येत आहे. यामुळे शेती आणि बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शेतकरी, बागायतदारांचं आर्थिक नुकसान

डिचोलीत गव्यांचा संचार यापूर्वी तुरळक प्रमाणात दिसत होता, मात्र अलीकडे तो अधिकच वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गवे घरांच्या जवळपास फिरतानाच्या घटनाही समोर आल्या होत्या. काही ठिकाणी गव्यांनी कुंपण आणि भिंतीही तोडल्याच्या घटना घडल्या आहेत.यामुळे नागरिक भयभीत झाले असून, रात्री उशिरा घराबाहेर पडणं टाळत आहेत.

गव्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व बागायतदारांचं आर्थिक नुकसान झालं आहे. केळी, नारळ, फणस, भाजीपाला यासारखी पिके गव्यांनी उद्ध्वस्त केली आहेत. काही ठिकाणी गवे झाडंही तोडून टाकत असल्यानं झाडांचं मोठं नुकसान झालं आहे.

Bicholim News

गव्यांचा बंदोबस्त

स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार केली असून, गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा अधिक मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT