wild boar attack in Goa Dainik Gomantak
गोवा

Wild Boar Attack: पैंगीणीत रानडुक्कराचा जीवघेणा हल्ला; शेतात काम करणाऱ्या महिलेने केले हिंस्त्र जनावराशी दोनहात

Wild Boar Attack Cancona Goa: पैंगीण काणकोण येथे शेतात काम करत असतानाच एका रानडुक्कराने महिलेवर हल्ला केला

Akshata Chhatre

काणकोण: पैंगीण काणकोण येथे शेतात काम करत असतानाच एका रानडुक्कराने महिलेवर हल्ला केला. वेळवाडा पैंगीण येथील जयंती वेळीप नावाची महिला या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. सकाळी शेतात काम करत असताना अचानक रानडुक्कराने महिलेवर हल्ला केला, तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी झटपट केली मात्र यात ती गंभीर जखमी झाली आहे.

मिलेल्या माहितीनुसार, शेतात काम करणाऱ्या महिलेवर रानडुक्कराने हल्ला चढवतात तिने दोन्ही हातांच्या साहाय्याने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत जयंती वेळीप या महिलेने त्या हिंस्त्र जनावरेही दोन हात केले, आणि या संघर्षात शेवटी तो रानडुक्कर पळून गेला.

जखमी महिलेवर हल्ल्यानंतर उपचार करण्यात आले, तिला प्राथमिक उपचारांसाठी काणकोण येथील समुदायीक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे.

या घटनेनंतर शेताचा मालक लक्ष्मण प्रभुगांवकर याने वनविभागत याबद्दल तक्रार नोंदवली आहे. वनविभाग अधीकारी अनंत वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून घटनेवर अधिक तपास सुरू आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक पावलं उचलली जातील तसेच जखमी महिलेला वनविभागाकडून भरपाई दिली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT