Vijai Sardesai During Goa Assembly Winter Session  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: काळा शर्ट, हातात फलक! राज्यपालांच्या संपूर्ण अभिभाषणात सरदेसाईंनी सभागृहात उभं राहून नोंदवला निषेध

Goa Assembly Winter Session 2025: राज्यपालांच्या पूर्ण अभिभाषणावेळी विजय सरदेसाईंकडून वरील फलक हातात घेऊन उभे राहत निषेध करण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यपालांच्या अभिभाषणावेळी गुरुवारी (०६ फेब्रुवारी) विरोधी आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला. मात्र यात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई सहभागी झाले नाहीत. त्यांनी विधानसभेत राज्यपालांचे भाषण सुरू असताना नोकर भरती घोटाळ्यावर आधारित फलक हातात घेऊन तासभर उभे राहणे पसंत केले.

या वर्षातील हे पहिलेच विधानसभा अधिवेशन असल्याकारणाने त्याची सुरवात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपाल भाषण करण्यासाठी उठले, त्याचवेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उठून बोलण्यास सुरवात केली.

आलेमाव म्हणाले की, राज्यपाल महोदय आपल्या केरळ राज्यामध्ये विधानसभेचे ५० दिवसाचे अधिवेशन होते. गोवा सरकार मात्र सहा महिन्यांमध्ये दोन दिवसांचे अधिवेशन घेते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

राज्यासमोर सध्या असलेल्या प्रश्नांवर आपण बोलणार आहात का? ढासळती कायदा व सुव्यवस्था म्हादईचा प्रश्न हे आमच्यासाठी महत्त्वाचे विषय आहेत, त्यावर तुम्ही बोलणे अपेक्षित आहे. ते बोलत असतानाच सरदेसाई यांनी फलक फडकवणे सुरू केले.

नोकरेखातीर दी रोख, भाजप सरकाराची एकूच मोख. वोगी रावल्यार सुटलो, आवाज काडटा ताका ठोक, हा मजकूर त्या फलकावर होता. राज्यपालांच्या पूर्ण अभिभाषणावेळी विजय सरदेसाईंकडून वरील फलक हातात घेऊन उभे राहत निषेध करण्यात आला

सल्लागार समितीचा अहवालही फेटाळला

विधानसभा कामकाज सल्लागार समितीचा अहवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवल्यानंतर विरोधकांनी तो फेटाळला. दोन दिवसांचे अधिवेशन घेणे आम्हाला मान्य नाही.

या संदर्भातील मुद्दे बैठकीत मांडले असतानाही इतिवृत्तात आणि अहवालात त्याचा समावेश का केला नाही, अशी विचारणा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी केली. त्यावर सभापतींनी बैठकीच्या वेळी लेखी पत्र दिले नव्हते असे नमूद केले. यानंतर आवाजी मतदानाने हा अहवाल स्वीकृत करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT