Technology Dependence Study Dainik Gomantak
गोवा

Technology Dependence Study: आवडत नसले तरी ॲप वापरणं का थांबत नाही? 97 संशोधनांतून समोर आली महत्त्वाची कारणं

Technology Discontinuance Behavior: एखादे मोबाईल ॲप आवडेनासे झाले, त्यातील सुविधा गैरसोयीच्या वाटू लागल्या किंवा त्यापेक्षा चांगले पर्याय उपलब्ध झाले, तरी अनेकजण त्याचा वापर सुरूच ठेवतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: एखादे मोबाईल ॲप आवडेनासे झाले, त्यातील सुविधा गैरसोयीच्या वाटू लागल्या किंवा त्यापेक्षा चांगले पर्याय उपलब्ध झाले, तरी अनेकजण त्याचा वापर सुरूच ठेवतात. हीच प्रवृत्ती मोठ्या संस्थांमध्येही दिसून येते. वर्षानुवर्षे वापरात असलेली संगणकीय प्रणाली गैरसोयीची ठरत असतानाही ती बदलणे कठीण जाते. यामागील कारणांचा अभ्यास गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे वरिष्ठ व्याख्याते स्मित घेलानी आणि आयआयएम कोझिकोडच्या प्रा. विदुषी पांडे यांनी केला आहे.

‘इन्फॉर्मेशन सिस्टिम्स फ्रंटियर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात सोशल मीडिया, मोबाईल ॲप आणि संस्थात्मक माहिती प्रणालींशी संबंधित ९७ संशोधनांचा आढावा घेण्यात आला. तंत्रज्ञानाचा वापर बंद करणे हा केवळ एका क्षणाचा निर्णय नसून, त्यातून निर्माण झालेल्या सवयी, भावनिक गुंतवणूक, परस्पर संबंध आणि अवलंबित्व यांच्याशी तो जोडलेला असतो, असे निष्कर्षांत नमूद केले आहे.

बदलताना सवयींचाही विचार आवश्यक

स्मित घेलानी यांच्या मते, तंत्रज्ञानाचा वापर करताना त्याभोवती निर्माण झालेल्या सवयी, दैनंदिन दिनक्रम आणि अवलंबित्व यांचा पुरेसा विचार केला जात नाही. त्यामुळे मर्यादा लक्षात येऊनही त्याचा वापर बंद करणे कठीण होते. या निष्कर्षांनुसार, ॲप निर्मात्यांनी वापरकर्त्यांचा वाढता सहभाग म्हणजेच समाधान, असे समजू नये. जुन्या प्रणाली बदलताना संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या सवयी, कामकाजाच्या पद्धती आणि प्रशासकीय व्यवस्थेचाही विचार करावा. तसेच, सरकारने प्रशिक्षण, प्रोत्साहन योजना आणि पारदर्शक नियमांच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाकडे होणारे संक्रमण सुलभ करावे, अशी शिफारस संशोधनात करण्यात आली आहे.

अतिरिक्त सुविधांचाही त्रास

वापरकर्त्यांना अधिक वेळ व्यासपीठावर गुंतवून ठेवण्यासाठी दिलेल्या सुविधा उलट परिणाम घडवू शकतात. सततच्या सूचना, पोस्ट आणि आवडीनुसार दाखवल्या जाणाऱ्या शिफारशींमुळे मानसिक थकवा आणि माहितीचा अतिरेक होतो. परिणामी, वापरकर्ते संबंधित व्यासपीठ सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसेच, एखादी प्रणाली तांत्रिकदृष्ट्या अधिक कार्यक्षम असली, तरी बदललेल्या गरजा आणि कामाच्या पद्धतींमुळे ती उपयुक्त ठरेलच असे नाही. कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष उपयुक्तता या वेगवेगळ्या बाबी असल्याचे संशोधनातून स्पष्ट होते.

चार घटकांचा प्रभाव

तंत्रज्ञानाचा वापर सुरू ठेवणे किंवा बंद करणे हे व्यक्ती, तंत्रज्ञान, कामाचे स्वरूप आणि संस्थात्मक रचना या चार घटकांवर अवलंबून असते. व्यक्तीच्या अपेक्षा व सवयी, तंत्रज्ञानाची कार्यक्षमता, त्यातून साध्य होणारी उद्दिष्टे, तसेच संस्थात्मक नियम, खर्च आणि सामाजिक दबाव या घटकांचा परस्पर मेळ असेपर्यंत वापर सुरू राहतो. हा मेळ बिघडल्यास वापर बंद करण्याची प्रवृत्ती वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: पिकनिकवरून परतताना काळाचा घाला! विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला भरधाव ट्रकची धडक; 4 मुलांचा मृत्यू, 35 जण जखमी

MSME Cyber Security Training: ऑनलाइन फसवणुकीपासून व्यवसाय वाचवण्यासाठी पुढाकार; गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे

Shirgao Mining Protest: शिरगाव वाचवा! खाणींमुळे गाव उद्ध्वस्त होण्याची भीती; लिलाव केलेल्या खाणपट्ट्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Ramayana Box Office Collection: भारतातच नाही तर परदेशातही 'रामायण'ची जादू! अवघ्या 19 दिवसांत जगभरात 1704 कोटींची बंपर कमाई

Bisleri Water Contamination: 'बिस्लेरी'च्या पाण्यात ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त; गोव्यातील प्लांटमधून घेतले होते नमुने

SCROLL FOR NEXT