Shirgao Mining Protest: शिरगाव वाचवा! खाणींमुळे गाव उद्ध्वस्त होण्याची भीती; लिलाव केलेल्या खाणपट्ट्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Shirgao Village Mining Impact: खाणकामामुळे शिरगाव उद्ध्वस्त होत असल्याचे संशोधक तसेच पर्यावरण कार्यकर्ते सागर धारा यांनी सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
Shirgao Village Mining Impact
Shirgao Mining ProtestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: खाणकामामुळे शिरगाव उद्ध्वस्त होत असल्याचे संशोधक तसेच पर्यावरण कार्यकर्ते सागर धारा यांनी सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे, असे म्हणत शिरगावातील स्थानिकांनी सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारने लिलाव केलेल्या खाणपट्ट्यांना तीव्र विरोध दर्शवला.

पर्यावरणप्रेमी क्लॉड अल्वारीस, सागर धारा, शिरगाव नागरिक समितीचे अध्यक्ष दिना गावकर यांच्यासह शिरगावातील स्थानिक यावेळी उपस्थित होते. शिरगावात १९७५ पासून खाणकाम सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम झालेले आहेत. शिरगावात एकूण ७२ विहिरी होत्या. परंतु, खाणकामामुळे त्या नष्ट झालेल्या आहेत. शिरगावातील जमिनीत पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जात होती. परंतु, सध्या ८० टक्के जमिनीवर खाणी सुरू आहेत.

Shirgao Village Mining Impact
Goa Politics: सासष्टीत काँग्रेससमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीशिवाय पर्याय नाही; नावेली, बाणावली, नुवेत आव्हान अधिक कठीण

साळगावकर, वेदांता आणि बांदेकर या तीन कंपन्यांना सध्या लिलावात जे खाणपट्टे मिळालेले आहेत, त्यात स्थानिकांची घरे, मंदिरे असून, खाण व्यवसायाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे, असे दिना गावकर यांनी सांगितले. सरकारने लईराई मंदिरापासून १५० मीटरचा ‘बफरझोन’ केला आहे. परंतु, तो अपुरा आहे. खाणपट्ट्यांच्या क्षेत्रांतून घरे, मंदिरे, शाळा आणि शेतजमिनी वगळल्या जाव्यात, तसेच जवळच्या निवासी घरापासून किमान २०० मीटरचा ‘बफरझोन’ ठेवला जावा, यासाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एक कोटीची पाणीबिले थकीत

खाणकामामुळे गावातील विहिरी आटल्यानंतर, खाण कंपन्यांनी नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे बिल भरण्याचे मान्य केले होते, परंतु, एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची ही बिले अद्याप भरलेली नाहीत. याशिवाय शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्यात आली नाही. शिरगावातील खाणपट्ट्यांचा लिलाव करून आर्थिक फायदा मिळवण्याचा विचार सरकार करीत आहे. परंतु, खाणींमुळे उद्ध्वस्त होत असलेले शिरगाव वाचवण्याची जबाबदारी आमची असून, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही दिना गावकर यांनी नमूद केले.

Shirgao Village Mining Impact
Goa Economic Growth: "गोव्याला सिंगापूर बनवायचे नाही, तर गोवाच ठेवून चमकवायचे आहे"; ‘सागर मंथन 5.0’मध्ये मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्यं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.