Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सरकारी जागेतही प्रकल्प का नको? कुडचिरेतील नियोजित प्रकल्पप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा सवाल; स्थानिकांच्या भूमिकेवर व्यक्त केली नाराजी

Waste Management Project In Kudchire: कुडचिरे येथील नियोजित प्रकल्प हा कचरा प्रकल्प नसून, वेस्ट मॅनेजमेंट महामंडळातर्फे ‘सी अँड डी’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सरकारी जमिनीतच सरकारी प्रकल्पाला विरोध का? हा कुठला न्याय? असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित करुन, कुडचिरे येथील नियोजित प्रकल्पाविषयी स्थानिकांच्या नकारात्मक भूमिकेबद्धल संताप व्यक्त केला.

कुडचिरे येथील नियोजित प्रकल्प हा कचरा प्रकल्प नसून, वेस्ट मॅनेजमेंट महामंडळातर्फे ‘सी अँड डी’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. कुडचिरे गावावर प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा सरकारचा विचार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट करुन, नियोजित प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कुडचिरे येथील लोक गावात सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे चालणारा चिरेखाणींचा व्यवसाय मान्य आहे काय? असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उपस्थित करुन, नियोजित प्रकल्पावरून विरोधक कुडचिरेवासियांना भडकावत आहेत. असा आरोप केला.

कुडचिरे येथील नियोजित प्रकल्पावरून वाद पेटल्यानंतर आज (बुधवारी) मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रथमच या विषयावर जाहीर भाष्य केले. अस्नोडा बगलमार्गाच्या पायाभरणी सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कुडचिरेवासीयांसह विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

कुडचिरे येथील श्री बाराजण देवस्थान परिसरात वेस्ट मॅनेजमेंट महामंडळातर्फे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या प्रकल्पाला कुडचिरेवासियांचा ठाम विरोध आहे. गेल्या गुरुवारी नियोजित प्रकल्पासाठी पोलिस बंदोबस्तात भू-सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यावेळी महिलांसह कुडचिरेतील संतप्त लोकांनी रस्त्यावर उतरून भू-सर्वेक्षण रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुडचिरे गावात वातावरण काहीसे तणावग्रस्त बनले होते. त्यानंतर प्रकल्पाच्या मुद्यावरून गेल्या रविवारी झालेल्या खास ग्रामसभेत कुडचिरेवासियांनी शक्तीप्रदर्शन करुन, प्रकल्प विरोधात एकमताने ठरावही मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या मुद्यावरुन अजूनही गावात किंचित तणावग्रस्त वातावरण आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT