Goa Kerala Murder Story Dainik Gomantak
गोवा

Crime Story: दोन वर्षापूर्वी केरळच्या तरुणाचा गोव्यात कुठे आणि का झाला खून? पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे

विशेष बाब म्हणजे संशयितांची दुसऱ्या एका प्रकरणात जबानी घेत असताना या खूनाचा उलगडा झाला आहे.

Pramod Yadav

Goa Kerala Murder Story: कोची, केरळ येथील तरुणाचा गोव्यात दोन वर्षापूर्वी खून झाल्याची घटना अलिकडेच उघडकीस आली आहे. 2021 साली तरुण बेपत्ता झाला होता, शोध घेताना त्याचा खून झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एर्नाकुलम टाऊन साउथ पोलिसांचे पथक गोव्यात तळ ठोकून आहे.

तपास पथकाच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले असून, तरुणाचा गोव्यात कोठे आणि कोणत्या कारणातून खून केला, याबाबत महत्वाचा खुलासा समोर आला आहे.

कोची येथील जेफ जॉन लुईस (27) नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता होता, दरम्यान त्याचा गोव्यात मित्रांनीच त्याचा खून केल्याचा समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोट्टायम येथील अनिल चाको (28), त्याचा नातेवाईक स्टीफिन थॉमस (24) आणि वायनाडचा टी.व्ही. विष्णू यांना अटक केली आहे.

संशयितांनी लुईस याचा हणजुणे परिसरात खून केल्याचे सांगितले असून, पोलिसांनी ही जागा शोधून काढली आहे. स्थानिक पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी याप्रकरणी प्राथमिक तपास आणि पंचनामा केला. ओळख पटली नसल्याने त्यावेळी मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दान करण्यात आला.

पोलिसांनी मयताचे डिएनए नमुने तपासासाठी घेतले असून, ते त्यांच्या कुटुंबियांची मॅच होतील अशी आशा त्यांना आहे. तपास पथक परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यासह हत्येला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा घटनाक्रम जुळवण्यात गुंतले आहेत.

प्राथमिक तपासानुसार, लुईस आणि त्याच्या मित्रांमध्ये अमली पदार्थ तस्करीतील आर्थिक व्यवहारावरुन वाद झाला. त्यातून मित्रांनी त्याला मारहाण करुन सुरु भोसकून खून केला आणि हणजुणे परिसरात मृतदेह फेकून दिला. असे पोलिसांनी द हिंदू या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

मृत लुईस बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. विशेष बाब म्हणजे संशयितांची दुसऱ्या एका प्रकरणात जबानी घेत असताना या खूनाचा उलगडा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

Goa Crime: म्हापशात पोलिसांची मोठी कारवाई;2 किलो गांजा जप्त, झारखंडच्या 22 वर्षीय युवकाला अटक

SCROLL FOR NEXT