Goa Crime: तोतया पोलिसांकडून 6 लाखांच्या मंगळसूत्रावर डल्ला, पिळगाव येथील महिलेची फसवणूक; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Pilgao Crime: गोव्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असतानाच आता चोरट्यांनी फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधल्या आहेत
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गोव्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असतानाच आता चोरट्यांनी फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधल्या आहेत. डिचोली तालुक्यातील पिळगाव येथील एका महिलेला सावधान करण्याच्या बहाण्याने दोन तोतया पोलिसांनी तब्बल ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पिळगाव येथील रहिवासी मोहिनी नाईक या गावकरवाडा येथे बस पकडण्यासाठी जात होत्या. यावेळी वाटेत एका पुरुष आणि एका महिलेने त्यांना अडवले. या दोघांनीही आपण पोलीस दलात कार्यरत असल्याचे भासवले. "या परिसरात चोरांचा सुळसुळाट झाला आहे, तुम्ही सोने अंगावर घालून फिरणे सुरक्षित नाही," असे सांगत त्यांनी मोहिनी नाईक यांचा विश्वास संपादन केला.

Goa Crime
Goa ZP Election: जिल्‍हा पंचायती भाजपकडे की विरोधक मारणार बाजी? जनतेचा कल होणार स्पष्ट; मंत्री, आमदारांच्‍या भवितव्‍याचाही फैसला

अशा प्रकारे केली फसवणूक

सुरक्षेचे कारण पुढे करत या तोतया पोलिसांनी नाईक यांना एका निर्जन स्थळी नेले. दागिने सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली त्यांनी महिलेला त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र काढायला लावले. चोरट्यांनी ते मंगळसूत्र एका कागदात गुंडाळण्याचे नाटक केले आणि तो कागदाचा पुडा मोहिनी नाईक यांच्या हातात दिला. "घरी गेल्याशिवाय हा पुडा उघडू नका," अशी ताकीदही त्यांनी दिली.

Goa Crime
Goa Weather Update: गोवा गारठला! पुढील चारही दिवस थंडीचे; पारा 18 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता

घरी गेल्यावर बसला मोठा धक्का

मोहिनी नाईक जेव्हा घरी पोहोचल्या आणि त्यांनी मोठ्या विश्वासाने तो कागदाचा पुडा उघडला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्या कागदात सोन्याचे मंगळसूत्र नसून केवळ एक दगड ठेवलेला होता.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने डिचोली पोलीस ठाणे गाठले. चोरीला गेलेल्या मंगळसूत्राची किंमत अंदाजे ६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. डिचोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com