Goa suicide case Dainik Gomantak
गोवा

Goa suicide case: गोवा पोलिसांवर संशय का बळावतोय?

राज्यात (Goa) गाजत असलेल्या सांकवाळ येथील तिहेरी आत्महत्या प्रकरणाबाबत पोलिसांवर संशय बळावत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) गाजत असलेल्या सांकवाळ येथील तिहेरी आत्महत्या प्रकरणाबाबत पोलिसांवर संशय बळावत आहे. कारण ज्‍युनियर डॉक्टरांकडे अपघातांत वगैरे ठार झालेल्यांची शवचिकित्सा सोपवली जाते. अशी शवचिकित्सा केल्यानंतर त्यांनी काढलेल्या निष्कर्षांवर वरिष्ठ तज्ज्ञ ‘आपली मान्यता आहे’ अशी स्वाक्षरी करतात. मात्र या अहवालावर तशी एकाही वरिष्ठाची सही नाही. (Why is there suspicion on Goa police?)

29 जून रोजी सकाळी हुलगप्पा अंबिगेरा, गंगप्पा अंबिगेरा आणि देवम्मा अंबिगेरा या तिघांनी आत्महत्या केली होती. यातील देवम्मा हिच्यावर चोरीचा आळ होता. त्यामुळे नाही म्हटले तरी हे प्रकरण गंभीर होते. अशावेळी वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षकाकडे असा तपास सोपवला जातो. मात्र तसे न करता हे प्रकरण वेर्णा पोलिस स्थानकातील अत्यंत कनिष्ठ उपनिरीक्षक प्रवीण सीमेपुरुषकर यांच्याकडे सोपविण्यात आले.

‘बायलांचो एकवोट’ या संघटनेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी या प्रकरणी पोलिस महासंचालक मीना यांना लिहिलेल्या पत्रात हे प्रकरण दिसते तितके साधे नसल्याचा उल्लेख केला आहे. मडगावात शवचिकित्सा न करता ती गोमेकॉत का केली आणि ती कनिष्ठ डॉक्टरांकडून का करवून घेतली, याचीही माहिती लोकांसमोर यायला पाहिजे. या प्रकरणात पोलिसांकडे संशयास्पद दृष्टीने बघितले जातेय. जर, पोलिसांची या प्रकरणात काही चूक नसेल तर खरी गोष्ट लोकांसमोर यायला पाहिजे.

दरम्यान, झुआरीनगर आत्महत्या प्रकरणातील तिघांचीही शवचिकित्सा डॉ. श्वेतलाना गोम्स, डॉ. अनुप चंद्रन व डॉ. भारत कुमार यांनी केली आहे. यातील डॉ. चंद्रन व डॉ. कुमार हे निवासी डॉक्टर आहेत. तर, डॉ. गोम्स यांची हॉस्पिसियोतील कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना प्रशिक्षणासाठी गोमेकॉत पाठविण्यात आले होते. एकूणच या प्रकरणामुळे गोवा पोलिसांबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT