CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Power Tariff Hike: वीज दरवाढ का आवश्यक? मुख्यमंत्री डॉ. सावंतांनी सांगितले कारण

Goa Power Tariff Hike: संयुक्त वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसार केवळ 0.60 ते 0.90 प्रतियुनिट वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Power Tariff Hike

संयुक्त वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसार गोव्यात प्रतियुनिट 3.5 टक्के वीज दरवाढ लागू केली आहे. या वीज दरवाढी विरोधात विरोधकांनी सडकून टीका केली तसेच, आगामी विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे देखील सांगितले.

पण, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकारच्या वीज दरवाढीचे समर्थन केले असून, याचा ग्राहकांवर अधिक भार येणार नाही, असे सावंत म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी वीज दरवाढ का गरजेची आहे याचे कारण देखील सांगितले.

वीज दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बिल सरासरी 8 ते 10 रुपयांनीच वाढेल. याचा ग्राहकांवर अधिक भार येणार नाही. येत्या काळात वीज विषयक साधनसुविधांसाठी दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉ. सावंत यावेळी म्हणाले.

संयुक्त वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसार केवळ 0.60 ते 0.90 प्रतियुनिट वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांची सबसिडी अपेक्षित असल्याचे सावंत यांनी सांगितले.

दरवाढ केली नाहीतर केंद्राकडून मिळणारे संभाव्य अडीच कोटी रुपयांच्या अनुदानाला मुकण्याची शक्यता आहे. राज्य सरकार लोकांना अनुदान देत राहिले तर केंद्र सरकारकडून राज्याला अनुदान मिळणार नाही, असेही स्पष्टीकरण मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

गोव्यातील वीज दरवाढीचा विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनी देखील विरोध केला आहे. केंद्रीय ऊर्जा, नवीन व अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यापाठोपाठ मडगावचे दिगंबर कामत यांनीही वीज दरवाढीचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.

तसेच, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेतील आपल्या चेंबरमध्ये पत्रकार परिषदेत सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले. वीज दरवाढ आणि चेंबरमधील वीज कनेक्शन तोडल्यावरून आलेमाव यांनी सरकारवर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

SCROLL FOR NEXT