Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : दिगंबरांचे कार्यकर्त्यांशी मनोमिलन; मात्र बैठकीबाहेर असताना 40 मिनिटांत काय झालं?

मुख्यमंत्री आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात सुमारे 40 मिनिटे संवाद झाला. या बैठकीत नेमकं काय बोलणं ते माहित नाही. मात्र भाजप नेत्यांनी बैठकीनंतर माध्यमांना आपल्या मनातील खदखद व्यक्त करुन दाखवली.

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat : गेली 17 वर्षे ज्यांच्या तोंडावरही नजर घालण्यास नाखूष असलेल्या मडगाव भाजप कार्यकर्त्यांबरोबर नव्यानेच भाजप पक्षात सामील झालेले आमदार दिगंबर कामत यांचे शेवटी मनोमीलन झाले खरे. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनाची तयारी होईपर्यंत कामत यांना तानावडे यांच्या केबिनमध्ये 40 मिनिटे ताटकळत बसावे लागले. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चाही सुरु झाली की दिगंबर कामतांना बाहेर ठेवत झालेल्या बैठकीत नेमकं झालं तरी काय? या बैठकीमध्ये अशी काय चर्चा झाली ज्यामुळे एकमेकांचं तोंडही न पाहणाऱ्या दिगंबर कामत आणि मडगावमधील भाजप नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

भाजपच्या पणजी कार्यालयात ही मनोमीलन बैठक झाली. या बैठकीला दिगंबर कामतांच्या विरोधात मडगावातून विधानसभेची निवडणूक लढवणारे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, यासोबतच कामतांविरोधात वेळोवेळी निवडणूक लढवणारे रुपेश महात्मे आणि शर्मद रायतुरकर यांच्यासह भाजपचे मडगावमधले प्रमुख कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नंतरच कामत यांना सभागृहात पाचारण केले. मुख्यमंत्री आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात सुमारे 40 मिनिटे संवाद झाला. या बैठकीत नेमकं काय बोलणं ते माहित नाही. मात्र भाजप नेत्यांनी बैठकीनंतर माध्यमांना आपल्या मनातील खदखद व्यक्त करुन दाखवली.

दिगंबर कामत यांना पक्षात घेतले म्हणून आमची काही हरकत नव्हती, पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन माहिती द्यावी अशी आमची अपेक्षा होती, अशी खंत बैठकीनंतर बाहेर आलेल्या शर्मद रायतुरकर यांनी व्यक्त केली. याआधीही दिगंबर कामत यांना भाजप पक्षात प्रवेश देण्याच्या बातम्या येत होत्या, त्यावेळी रायतुरकर यांनी ‘ज्यांनी मनोहर पर्रीकर यांचा घात केला त्यांना पक्षात घेण्याचे प्रयोजन काय?’ असा सवाल केला होता.

एकीकडे दिगंबर कामत यांना पक्षात घेतले म्हणून आम्ही नाराज नाही. मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये कायम रहावे. मडगाव मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी त्यांना मंत्रिपद द्यावे अशीही आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते नवीन रायकर यांनी दिली आहे, तर

सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची कार्यकर्त्यांची अपेक्षा मी पूर्ण करणार आहे. दुसऱ्या पक्षात होतो, तरीही भाजप कार्यकर्त्यांशी माझा संपर्क होताच, असा दावाही दिगंबर कामत यांनी केला आहे.

दिगंबर कामत यांना गोव्यात उपमुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. मात्र हे मंत्रिपद कामतांना देण्यात आल्यास त्यांना नगरनियोजन व खाण अशी खाती मिळू शकतात. राज्यातील खनिज उद्योजकांनी कामत यांच्या बाजूने जोर लावला आहे. शिवाय गुजरातमधील काही उद्योगपतीही त्यांच्‍या मागे उभे असल्याचे चित्र आहे. हे फेरबदल लागलीच घडल्यास गोवा सरकारचा तोल ढळू शकतो, अशी चर्चा भाजपामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक नेते अस्वस्थ आहेत.

असं असलं तरीही अमित शहा आणि नड्डा यांच्या बैठकीमध्ये कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे व अन्य कोणती लाभाची पदे द्यायची याबाबत कसली चर्चा झाली नाही. त्यामुळे सध्यातरी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार नाहीत. पण बंडखोरांपैकी काहींना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. मात्र नव्याने दाखल झालेल्या या आमदारांना राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी गोव्यातल्या लोकसभेच्या दोन्ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकाच, असे सांगितले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व नियोजन करावे, अशीही सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bomb Blast In Pakistan: पाकिस्तानमध्ये LIVE क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी Watch Video

Affordable 350CC Bikes: स्पोर्टी लूक, दमदार परफॉर्मन्स...! 'या' धमाकेदार बाइक्समध्ये मिळतंय सर्व काही, किंमत फक्त...

Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

Online Food Ordering Platforms: Zomato, Swiggy वरून जेवण ऑर्डर करणं महाग, कोणतं प्लॅटफॉर्म देतंय स्वस्त डिलिव्हरी सेवा? जाणून घ्या

Zimbabwe vs Sri Lanka: सिकंदर रजाचा 'डबल धमाका'! श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत केली मोठी कामगिरी; SKY आणि सेहवागला सोडले मागे

SCROLL FOR NEXT