Madkai  Dainik Gomantak
गोवा

Madkai News : मडकई मतदारसंघातून मताधिक्‍य का घटले? भाजप कार्यकर्त्यांचा सुदिन ढवळीकर यांना प्रश्‍‍न

Madkai News : बेताल वक्‍तव्‍य टाळण्‍याचा दिला सल्‍ला; कारवाईची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Madkai News :

फोंडा, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला कमी मते पडली, त्याला भाजप कार्यकर्तेच कारणीभूत असल्याचा मडकई मतदासंघाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेला आरोप पूर्णत: चुकीचा असून, असे बेताल वक्तव्य करणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना आधी मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी जोरदार मागणी भाजप मंडळ तथा मडकई मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

तसेच गतवेळच्‍या तुलनेत मडकई मतदारसंघातून मताधिक्‍य का घटले, असा प्रश्‍‍नही त्‍यांनी केला आहे. सुदिन ढवळीकर यांच्यावर आधी कारवाई करा, असेही या कार्यकर्त्यांनी सांगितले.

फोंड्यात शुक्रवारी (ता.१४) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी सुदेश भिंगी व इतर कार्यकर्त्यांनी केली. यावेळी संतोष रामनाथकर, प्रशांत नाईक, जयराज नाईक, दिनेश वळवईकर, सुभाष गावडे आदी उपस्थित होते.

बूथ क्रमांक १८वर अत्‍यंत कमी मते

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवाराला ४ हजार मते, तर मगोप उमेदवाराला १३ हजार ९६३ मते पडली. ही एवढी मते लोकसभा निवडणुकीत का पडली नाहीत? याचे उत्तर सुदिन ढवळीकर यांनी खरे म्हणजे द्यायला हवे होते, असे सांगत मडकई मतदारसंघातील बूथ क्रमांक १८वर अत्‍यंत कमी मते भाजप उमेदवाराला कशी काय पडली, त्याचाही विचार मगोपच्‍या नेत्‍यांनी करावा, असा सल्‍ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT