Loksabha Dainik Gomantak
गोवा

Loksabha Voting Panaji : पणजीत मतदान कमी का झाले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अनियोजित कामामुळे पणजीकर नाखुश

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Voting Panaji :

पणजी, ही राज्याची राजधानी. पणजीकर हे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच इतर क्षेत्रात अग्रणी भाग घेणारे. तरीदेखील पणजीकरांनी मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा लोकसभा निवडणुकीकडे पाठ फिरवली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात घट झाली आहे.

२०१९ साली पणजीत ७१.५८ टक्के एवढे मतदान झाले होते. पंरतु यावेळी त्यात घट होऊन ६७.२६ टक्के मतदान करण्यात आले. पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीकरांना प्रदूषण तसेच अनेक त्रासांना सामोरे जावे लागले.

अनेक व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. या सगळ्या जाचाला पणजीकर कंटाळले होते. स्मार्ट सिटीमुळे झालेल्या त्रासाचा वचपा नागरिकांनी मतदानाला न जाता काढल्याचे बोलले जात आहे.

पणजीतील निवडणुकीत यंदा मतदान कमी होण्याची कारणे काय आहेत, याबाबत सद्यस्थितीत काही सांगणे कठीण आहे. याबाबत नेमके काय झाले, ते पाहावे लागेल. पणजी स्मार्ट सिटीतील कामे हे याचे एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे; परंतु नेमकेपणाने आताच काही सांगता येणार नाही.

- उत्पल पर्रीकर

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेक मतदारांना प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना मतदानाला जाणे कठीण झाले, त्यामुळे मतदानात घट झाली. त्यासोबतच अनेकांनी स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नाखुशी व्यक्त करत मतदान करण्याचे टाळल्याचे दिसते.

- उदय मडकईकर, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

SCROLL FOR NEXT