Arvind Kejriwal Goa Tour Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal Goa Tour: अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौरा अचानक पुढे का ढकलला?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केजरीवाल गोव्यात येणार होते

Pramod Yadav

Arvind Kejriwal Goa Tour: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गुरुवारपासून गोवा दौऱ्यावर येणार होते. दरम्यान, केजरीवाल यांनी गोवा दौरा अचानक रद्द केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केजरीवाल गोव्यात येणार होते. पण, सध्यातरी त्यांचा दौरा लांबणीवर पडला आहे.

केजरीवाल गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गोव्याला येणार होते. पण प्रजासत्ताक दिनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा गोवा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आता ते पुढील आठवड्यात गोव्याला रवाना होतील, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

केजरीवाल 11 जानेवारी रोजी दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर येणार होते आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार होते.

"दोन दिवसांचा गोवा दौरा लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आहे. ते पक्ष कार्यकर्त्यांशीही संवाद साधतील," असे एका सूत्राने सांगितले होते.

दरम्यान, विरोधी पक्षानी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत गोव्यातील जागावाटपावरही चर्चा झाल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. आम आदमी पक्षाने दिल्ली, पंजाब आणि हरियाणाशिवाय गोव्यातही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, गोव्यात दोनच जागा असल्याने युतीत आपला किती जागा मिळतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT