CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कशाला हवा युनिफॉर्म?' कॉलेजकुमारला मुख्यमंत्री सावंतांनी समजावून सांगितली संकल्पना

CM Sawant on Uniform in Colleges: मुलांनी मुख्यमंत्र्यांना कॉलेजमध्ये असताना सुद्धा युनिफॉर्म का? असा प्रश्न केला असता डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रश्नाला उत्तर दिले

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील विविध कॉलेजेस मधल्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पणजीत संवाद साधला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी तरुणांना येणाऱ्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले. यावेळी मुलांनी मुख्यमंत्र्यांना कॉलेजमध्ये असताना सुद्धा युनिफॉर्म का? असा प्रश्न केला असता डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रश्नाला उत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांनी तरुणांना पटेल अशा शब्दांत या प्रश्नाचे उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की कॉलेजमधल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानता निर्माण व्हावी म्हणून युनिफॉर्मची संकल्पना तयार करण्यात आलीये. काही मुलांना इतरांप्रमाणे महागडे कपडे विकत घेता येत नाही आणि परिणामी ते शाळा किंवा कॉलेज सोडून जातात.

अशा अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मोठ्या मोठ्या बुलेट किंवा महागडे कपडे वापरून कॉलेजमध्ये येणं प्रत्येकाला जमत नाही, यामुळे अनेकांना मानसिक दृष्ट्या देखील त्रास सहन करावा लागतो आणि म्हणूनच समानता निर्माण करण्यासाठी युनिफॉर्म महत्वाचा आहे.

गोव्यात धावणार मेट्रो

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी गोव्यात लवकरच सुरु होणाऱ्या मेट्रोच्या प्रकल्पाकडे लक्ष वेधलं. गोव्यात यापूर्वी देखील मेट्रोचा प्रकल्पाची चाचणी प्रक्रिया झाली होती, मात्र काही कारणास्तव तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता.

आजच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यानी गोव्यातील मेट्रोचा प्रकल्प सध्या दुसऱ्या टप्प्यावर असल्याची माहिती दिली. सध्या गोव्यातील मेट्रोचा प्रकल्पाबद्दलची चर्चा सुरु आहे. गोवा सरकारकडून हा प्रकल्पाबद्दलचे प्रपोजल तयार आहे आणि याबद्दल लवकरच भारतीय रेल्वेशी चर्चा सुरु असल्याने येणाऱ्या काळात मेट्रोचा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT