Goa | Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality : मडगाव पालिकेत पेच; डेटा एन्ट्री ऑपरेटर्सचे वेतन कोण देणार?

नियुक्ती रद्द होऊन महिनाभर कार्यरत

दैनिक गोमन्तक डिजिटल

Margao Municipality : एक फेब्रुवारी रोजी नगरपालिका प्रशासन संचालनालयाने दहा डेटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या नियुक्तीची मंजुरी मागे घेतल्याचे मडगाव नगरपालिकेला कळवूनही या दहा जणांनी पूर्ण फेब्रुवारी महिना काम केले.

आता नगरपालिका प्रशासन संचालनालयाने नगरपालिकेला त्या 1 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या नियुक्ती आदेश मागे घेतल्या संदर्भातचा अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे मडगाव नगरपालिका प्रशासन गडबडलेले आहे.

यात नेमकी चूक कोणाची हा मोठा प्रश्र्न उपस्थित झाला आहे. दुसरा प्रश्र्न असा की, या दहाही डेटा एन्ट्री ऑपरेटर्सचा फेब्रुवारी महिन्याचा पगार कोण देणार? नियुक्तीची मंजुरी मागे घेऊनही या दहाही डेटा ऑपरेटर्सना फेब्रुवारी महिन्यात काम करायला लावण्याचा धोका कुणी पत्करला? हा प्रश्र्नही उपस्थित होत आहे.

नेमक्या कोणत्या कारणास्तव नगरपालिका प्रशासन संचालनालयाने या दहा डेटा ऑपरेटर्सच्या नियुक्तीची मंजुरीचा आदेश मागे घेण्याचा निर्णय का घेतला? असे अनेक प्रश्र्न मडगावकरांना पडलेले आहेत.

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारासाठी फेब्रुवारी महिन्यातील या दहाही डेटा एन्ट्री ऑपरेटर्सचा हजेरीपट रिक्रुटमेंट सोसायटी ऑफ गोवाला पाठविला तर नियुक्तीची मंजुरी मागे घेऊनही या दहा जणांना पूर्ण फेब्रुवारी महिना काम करण्यास कुणी परवानगी दिली. हा प्रश्र्न उपस्थित केला जाईल.

जर मुख्याधिकाऱ्यांनी हजेरीपट पाठविला नाही, तर त्यांना पगार मिळणार नाही, अशा द्विधा मनःस्थितीत मडगाव नगरपालिका प्रशासन असल्याचे कळते.

अधिकाऱ्यांची बदली...

मडगाव नगरपालिकेतील लेखा अधिकाऱ्याला पणजीतील लेखा संचालनालयात बदली केल्याचे कळते. या महिला लेखा अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर (ऑन डेप्युटेशन) एका वर्षासाठी मडगाव नगरपालिकेत पाठवले होते. सध्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या लेखा अधिकाऱ्याला मडगाव नगरपालिकेचा अतिरिक्त ताबा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT