ATM Fraud : एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यावरून लंपास केले 46 हजार रुपये

म्हापशात फसवणुकीचा प्रकार : मदत करण्याच्या बहाण्याने डल्ला
Goa Crime: ATM Fraud
Goa Crime: ATM FraudDainik Gomantak

ATM Fraud : हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातील 46 हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली. म्हापसा मार्केट रोडवरील सेंट्रल बँकेच्या एमटीएम कक्षामध्ये हा चोरीचा प्रकार घडला.

उदय माशेलकर (63, रा. काणका) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी यासंदर्भात म्हापसा पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून एका अनोळखी विरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Goa Crime: ATM Fraud
School Admission : प्रवेश शुल्काच्या नावाखाली प्रचंड लूट; पालक हतबल

प्राप्त माहितीनुसार, उदय माशेलकर हे गुरुवारी (ता.2) सकाळी म्हापसा मार्केट रोडवरील सेंट्रल बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तिथे पैसे काढण्यास मदत करण्याच्या हेतूने अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील एटीएम कार्ड घेऊन ते पुसण्याचा बहाणा केला.

नंतर हातचलाखीने आपल्याकडील कार्ड माशेलकर यांच्याकडे दिले आणि त्यांच्या कार्डचा वापर करून खात्यावरील 46 हजार रुपये लंपास केले. हा प्रकार फिर्यादी माशेलकर यांना थोड्या वेळानंतर एसबीआय बँकेत गेल्यावर समजला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com