Bombay High Court Hearing On Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Court: वृद्ध आईचा सांभाळ करायचा कोणी? दोन भाऊ, तीन बहिणींचा वाद पोहोचला उच्च न्यायालयात

The High Court Of Bombay At Goa: गोव्यातील म्हापसा येथील एक वृद्ध महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने निवाडा देताना मुलाकडे आईची जबाबदारी सोपवत दरमहा १० हजार रुपये खर्च देण्याचे आदेश दिले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: वृद्ध आईचा सांभाळ करायाचा कोणी? याबाबतचा दोन भाऊ आणि तीन बहिणींमधील वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोहोचला. आईच्या वृद्धापकाळाचा खर्च फक्त मुलांनीच करायचा का, की मुलींची देखील तेवढीच जबाबदारी आहे? असा सवाल न्यायालयात उपस्थित करण्यात आला.

झाले असे की, गोव्यातील म्हापसा येथील एक वृद्ध महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने निवाडा देताना मुलाकडे आईची जबाबदारी सोपवत दरमहा १० हजार रुपये खर्च देण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी न्यायमूर्ती असलेल्या या प्रकरणाचा ऑक्टोबर २०२३ मध्ये निर्णय देण्यात आला होता. या निर्णयामुळे नाखुश मुलाने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

आम्ही दोन भाऊ आणि तीन बहिणी असताना एकट्यानेच १० हजार रुपये खर्च का उचलायचा सवाल मुलाने उपस्थित केला. तसेच, आईचा सांभाळ करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे मत त्याने मांडले. दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थित चौकशी न करता निवाडा दिल्याचे निरीक्षण नोंदवत खटला पुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे.

या प्रकरणाचा पुन्हा अभ्यास करण्याचा आदेश देखील देण्यात आला असून, तोपर्यंत दरमहा तीन हजार रुपये खर्च देण्याचे आदेश कोर्टाने मुलाला दिले आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी १६ जून २०२५ रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT