Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik: उत्तर गोव्यातून लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण? काय म्हणाले विद्यमान खासदार श्रीपाद नाईक...

दिलीप परूळेकर यांनी मंगळवारीच व्यक्त केली होती तिकीटाची इच्छा

Akshay Nirmale

Shripad Naik: लोकसभा निवडणुकीला अद्याप ८ महिन्यांचा काळ बाकी असतानाच गोव्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांना डावलल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे मत मंगळवारी माजी पर्यटन मंत्री दिलीप परूळेकर यांनी व्यक्त केले होते. दरम्यान, यावरून आता श्रीपाद नाईक यांनीही त्यांचे मत व्यक्त केले आहे.

श्रीपाद नाईक म्हणाले की, भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित्त करण्याचे काम संसदीय मंडळ करत असते. त्यामुळे उमेदवारीवरून कुणीही गैरसमज निर्माण करू नयेत. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा आहे. मी तशी तयारीही सुरू केली आहे.

लोकसभेच्या तिकीटाबाबत जे बोलत आहेत ते प्रगल्भ नाहीत. ते जे बोलताहेत त्यांच्या बोलण्याला कसलाही आधार नाही. एखाद्या विद्यमान आमदाराचे तिकीट कापायचे असेल तर त्यासाठी तसेच काहीतरी ठोस कारण असावे लागते किंवा पक्षाची काही एक गरज असावी लागते, असेही श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंगळवारी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिलीप परूळेकर यांनी म्हटले होते की, काही कारणास्तवव श्रीपादभाऊंना तिकीट नाकारल्यास माझ्या नावाचा विचार करावा, असे मी पक्षाला बोललो आहे. हा माझा हट्ट नाही, तर माझी मागणी आहे, असे परूळेकर म्हणाले होते.

यापुर्वीही श्रीपाद नाईक यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. तथापि, काहीजणांकडून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वक्तव्ये केली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT