Goa sports minister Govind Gaude On 37 th National Games 2023 Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गावडेंबाबत गैरसमज पसरविणारे ‘ते’ कोण?

Goa Politics: चर्चा सुरू : भाजपमध्‍ये संतापाची लाट

दैनिक गोमन्तक

Goa Politics: ‘‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आपल्याबाबत चुकीची माहिती पोहोचविली जात होती. त्यांच्या मनात आपल्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता’’ या क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या जाहीर आरोपांचे सत्ताधारी भाजपमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

यापूर्वीच गावडे यांच्‍याबाबत सत्ताधारी वर्तुळात असलेली नाराजी त्‍यामुळे आणखी वाढली आहे. पाच राज्यांतील निवडणुकांनंतर गावडे यांना भाजप कार्यालयात पक्षशिस्तीचे धडे देण्यासाठी पाचारण केले जाऊ शकते.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सत्रावर जनतेचा अघोषित बहिष्कार पडल्यासारखाच होता. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घडल्याने पक्षाचे स्थानिक पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.

पाच हजारांचे सभागृह भरण्यासाठी कितीसा वेळ लागणार होता? सरकारला ते शक्य नव्हते, तर ती जबाबदारी पक्षसंघटनेकडे दिली पाहिजे होती असे पक्षाचे म्हणणे होते. मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या भावना पोहोचविण्यात आल्या आहेत.

त्याआधी कला अकादमीच्या कामाचे कंत्राट निविदा न मागवता देणे, त्याचे समर्थन करताना शहाजहाँ यांच्या ताजमहालाच्या कामाशी तुलना करणे आदींवरून भाजपचे नेते गावडे यांच्‍यावर नाराज होते.

त्यातच कला व संस्कृती खात्याचे मंत्री असताना त्याच खात्याच्या खर्चातून नूतनीकरणाच्या दिवशी गावडे यांची प्रमुख भूमिका असलेला नाट्यप्रयोग सादर करणेही भाजपला खटकले आहे.

निदान उद्‍घाटनाच्या दिवशी तरी असे होता कामा नये होते, असे उद्‍गार भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमक्ष काढले होते.

मंत्री गावडे यांच्याविषयी भाजपचे असे मत असले तरी मंत्रिमंडळातील सत्तासंघर्षात आपल्यासोबत एकनिष्ठ राहणारा सहकारी म्हणून मुख्यमंत्री गावडे यांना ते दुखावू इच्‍छित नाहीत.

मंत्रिमंडळ फेररचना करायची झाल्यास मंत्र्यांना वगळताना ‘कोण कोणाच्या जवळचा’ हा निकष कसा लावायचा याचे नियोजन आधीच करण्यात आले आहे.

नाराजीत वाढ

या साऱ्या पार्श्वभूमीवर मंत्री गावडे यांनी वरील वक्तव्य केल्याने भाजपमधून मुख्यमंत्र्यांना ही माहिती दिली जाते असे गावडे यांना म्हणायचे आहे, असा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा समज झाला आहे. त्यातून गावडे यांच्याविषयी असलेली नाराजी आणखी वाढली आहे.

गावडे यांनी जाहीर वक्तव्य करून या नाराजीला आपण किंमत देत नसल्याचे दाखवून दिल्याने प्रयोळ मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या गावडे यांना पक्षशिस्त काय ते समजावून सांगण्याची तयारी सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT