Goa News |Corruption Dainik Gomantak
गोवा

Goa News: ...यासाठी बिल्डरकडून पाच लाख घेणारा नगरसेवक कोण ?

चोपडेकर-चोडणकर आक्रमक : आठवड्यात कार्यालय हटवू - महापौरांचे आश्‍वासन

दैनिक गोमन्तक

Goa News: देशातील प्रख्यात बिल्डरच्या एका प्रकल्पाची उभारणी पाटो भागात केली जात आहे. ‘त्या’ कंपनीने कार्यालय रस्त्यावर थाटले आहे. त्यासाठी पाच लाखांची लाच नगरसेवकाने घेतल्याची चर्चा सुरू होती.

त्याविषयी ‘दै. गोमन्तक’ने प्रसिध्द केलेल्या मजकुराचा दाखला देत आक्रमक झालेले नगरसेवक विठ्ठल चोपडेकर, नगरसेवक शुभम चोडणकर यांनी लाचप्रकरणाची चौकशी करा, तसेच ते कार्यालय त्वरित हटवा,अशी मागणी केली. त्यावर चौकशीची मागणी फेटाळून आठवड्यात कार्यालय हटवू, असे आश्‍वासन महापौर रोहित मोन्सेरात यांनी सभागृहाला दिले.

महापौर मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पणजी महापालिकेच्या झालेल्या सभेत लाच प्रकरण चांगलेच गाजले. याप्रसंगी नूतन आयुक्त क्लेन मदेरा, उपमहापौर संजीव नाईक यांची उपस्थित होती.

प्रारंभी नगरेसवक सुरेंद्र फुर्तादो यांनी नूतन आयुक्त मदेरा यांच्या स्वागताचा, तर नगरसेवक वसंत आगशीकर यांनी प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्योएल आंद्रादे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

माजी महापौर तथा नगरसेवक विठ्ठल चोपडेकर व नगरसेवक शुभम चोडणकर यांनी पाटोवरील बिल्डरचे कार्यालय रस्‍त्यावर स्थापण्यासाठी पाच लाख रुपये कोणी घेतले, हे समजले पाहिजे. आम्हाला याबाबत विचारणा होते, त्यामुळे प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

यावेळी चोपडेकर यांनी ‘गोमन्तक’च्या सदरातील ‘तो नगरसेवक कोण?’ ही ‘खरी कुजबुज'' वाचून दाखविली. त्यावर विरोधी बाकावरील सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर, ज्योएल आंद्रादे यांनी याविषयी प्रश्‍न उपस्थित केले.

मडकईकरांनी मंदिरात सर्वांच्या हाती नारळ द्यावेत, अशी सूचनाही केली. चोडणकर यांनी अजूनही कार्यालय हटविले नसल्याचे छायाचित्र दाखवत ती कार्यालये कधी हटवणार? असा सवाल केला. त्यावर महापौरांनी कार्यालये हटवू, असे आश्‍वासन दिल्याने चर्चा थांबली.

चौदाव्या वित्त आयोगाचे रु. .38 कोटी महापालिकेचे पडून आहेत. ते खर्च न करता 15 वित्त आयोगाकडे निधी का मागता असे फुर्तादोंनी महापौरांना विचारले. त्यावर महापौरांनी हा निधी उद्यानांसाठी वापरणार,असे सांगितले.

पावसाळ्यानंतर रामाणींना बोलवा!

पणजी शहरात रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे, त्याशिवाय स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. असे असताना नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जात नाही. आम्हाला नागरिक प्रश्‍न विचारत असून, ती कामे कधी पूर्ण होणार, त्याचा पूर्णपणे आराखडा द्यावा आणि या कामांविषयी स्पष्टीकरण द्यावे,

त्यासाठी स्मार्ट सिटीच्या रामाणींना बोलवावे, अशी मागणी मडकईकर यांनी केली. त्यावर सर्व नगरसेवकांनीही होकार दिला, परंतु पाऊस जाऊ द्या, वास्तव समोर आल्यानंतर त्याला बोलावू, असे मोन्सेरात यांनी सभागृहाला सांगितले.

1.20 कोटी वर्षाला! : महापालिकेच्या मार्केट समितीने प्रलंबित मार्केटमधील सोपो करातील रक्कम पाच रुपयांनी वाढविलेली आहे. त्यामुळे वीस रुपये अधिक वस्तू सेवा कर दोन रुपये असा 22 रुपयांप्रमाणे जागेच्या आकारानुसार सोपो कर आकारला जाणार आहे.

त्यामुळे वर्षाला महापालिकेला 1.20 कोटी रुपये सोपो करातून मिळणार आहेत, असे स्पष्टीकरण बेंटो सिल्वेस्टर लॉरेन यांनी नगरसेवक मडकईकर-फुर्तादो यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर दिले. यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येणार असेल, तर आम्ही तुमचे अभिनंदन करतो, असा चिमटाही मडकईकर यांनी बेंटो यांचा काढला.

पार्किंगचा प्रश्‍न चर्चेत

मळ्यातील पार्किंगचा विषय, त्याशिवाय नको तिथे उभारलेले गतिरोधक, रात्री कॅसिनोत जाणाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगमुळे येथील लोकांना होणाऱ्या त्रासाचा विषयी कधी सोडवणार, असा सवाल शुभम चोडणकर यांनी केला.

वाहनधारकांना पार्किंग स्टिकर देण्याविषयीची सूचना मडकईकर यांनी मांडली. त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या पार्किंगच्या विषयावर कबिर माखिजा पिंटो यांनी बोट ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Gunshot: "आम्हाला गँग्स ऑफ गोवा'ची भीती!" नायबाग येथे गोळीबार, 2 कामगार गंभीर जखमी; LOP यांचा सरकारवर निशाणा

Mandovi River Casino: मांडवीत सातव्या 'कॅसिनो'ला परवानगी नाही! चौकशीतून खुलासा; कोणताही प्रस्ताव नसल्याचा दावा

Formula 4 Race Goa: ‘फॉर्म्युला 4’ रेससाठी नव्या जागेचा शोध! बांबोळी, वेर्णा पठाराची पाहणी; सलग 3 वर्षे होणार आयोजन

Goa Coal Protest: 'कोळशाला विरोध करण्यासाठी गोव्यातील जनतेने सहभागी व्हावे'! सरदेसाईंचे आवाहन; जागृती सभेचे आयोजन

तुफान वादळ, खवळलेला अरबी सागर; 11 दिवस जीवाचा संघर्ष केल्यानंतर 31 मच्छिमारांची घरवापसी

SCROLL FOR NEXT