Honda Panchayat  Dainik Gomantak
गोवा

होंडा पंचायत क्षेत्रात मतांची कुणाला आघाडी? 12 मतदान केंद्रांची व्यवस्था

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : पर्ये () मतदार संघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या कार्य क्षेत्रात यंदा एका मतदान केंद्रांची भर पडली असल्याने यावेळी 12 मतदान केंद्रावरून एकूण 6752 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या मध्ये 3410 पुरूष तर 3342 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघांतील इतिहासात प्रथमच या मतदारसंघांतून सतत निवडूण येणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) हे निवडणुकीच्या रिंगणात नसताना पार पडणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीत कोणता पक्ष होंडा पंचायत क्षेत्रात मतांची आघाडी घेणार हे पाहणे फार उत्सुकता ठरणार आहे.

यामध्ये आप पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात गेल्या दोन विधानसभेच्या निवडणुकीत भाजप (BJP) पक्षाच्या वतीने निवडणुक लढवलेले विश्वजित कृष्णराव राणे हे याच पंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्याने या मध्ये जास्त भर पडली आहे.

गोवा विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) सोमवारी दि 14 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे, यंदा मतदान करण्याची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. या पंचायत (Panchayat) क्षेत्रातील एकूण 11 प्रभाग मिळून बारा मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी या पंचायत क्षेत्रात एका नवीन मतदान केंद्रांची भर पडल्याने पर्ये मतदार संघात एकूण 56 मतदान केंद्रे असणार आहे, यामध्ये होंडा पंचायत क्षेत्रात 45 ते 56 पर्यंत मतदान केंद्राचा समावेश आहे.

यावेळी प्रथमच पर्ये मतदार संघात अपराचित राहिलेले विद्यमान आमदार (MLA) तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, आणि या पुर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांच्या पाठिशी उभे असायचे परंतू या निवडणुकीत (Election) आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे भारतीय जनता पक्षात असून या मतदारसंघात त्यांच्या सौभाग्यवती डॉ दिव्या राणे या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, त्याच प्रमाणे आम आदमी पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विश्वजीत कृष्णराव राणे हे स्थानिक उमेदवार आहेत.

त्याच प्रमाणे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अँड गणपत गावकर, काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर रणजित राणे, आरजी तर्फे समीर सतरकर, शिवसेनेचे गुरूदास गावकर, महाभारत तर्फे जयश्वेवर गावडे हे उमेदवार रिंगणात आहेत, परंतू या पंचायत क्षेत्रात भाजप, आप व तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षा मध्ये यंदाची निवडणूक रंगणार आहे. या मध्ये कोण किती मतांची आघाडी घेणार हे पाहण्यासाठी मात्र 10 मार्च पर्यंत थांबावे लागणार आहे.

या पंचायत क्षेत्रातील मतदान केंद्रांप्रमाणे मतदार संख्या पुढील प्रमाणे मतदान केंद्र 45 - 749, 46-483, 47-480, 48- 959, 49- 541, 50-690, 51- 299, 52-516, 53-126, 54-800, 55-649, 56-460 या मध्ये पुरूष 3410 तर 3342 महिला मतदारांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT