Colvale Police Dainik Gomantak
गोवा

Colvale: मोठी बातमी! कोलवाळ पोलिसांकडून 20 लाखांचे दुर्मिळ 'व्हाईट गोल्ड' जप्त, UP येथील एकाला अटक

चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरच्या उत्प्रेरक कन्व्हर्टरमधून काढलेले प्लॅटिनमच्या मूलद्रव्याला 'व्हाईट गोल्ड' म्हटले जाते.

Pramod Yadav

कोलवाळ पोलिसांनी आज मोठी कारवाई केली असून, 'व्हाईट गोल्ड' (White Gold Theft In Goa) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्मिळ पदार्थाची चोरी उघडकीस आणली आहे. चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरचा उत्प्रेरक कन्व्हर्टरमधून काढलेले प्लॅटिनमच्या मूलद्रव्याला 'व्हाईट गोल्ड' म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात याला खूप मागणी असून, त्याचे मूल्य अधिक आहे. कोलवाळ पोलिसांनी तब्बल वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, उत्तर प्रदेश येथील एका आरोपीला अटक केली आहे.

White Gold theft case cracked by Colvale Police

पोलिसांनी मोहम्मद परवेझ यामीन (रा. मेरठ, उत्तर प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी प्रत्येकी आठ हजार किंमतीचे चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरचे एकूण 122 उत्प्रेरक कन्व्हर्टर, ज्याची एकूण किंमत 9 लाख 76 हजार आणि 10 लाख 56 हजार किमतीचे प्लॅटिनमचे घटक असलेले 66 किलो कार्बन / धूळीचे कण जप्त केले आहेत. या सर्वाची किंमत 20 लाख 32 हजार एवढी आहे. आरोपीने गोवा आणि महाराष्ट्रातील चारचाकीतून ही चोरी केली आहे.

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद हा चारचाकी गाडीतून सायलेन्सरचा उत्प्रेरक कन्व्हर्टर चोरी करायचा. त्यातून महागडा प्लॅटिनम काढून तो दिल्ली आणि पुणे येथील डिलरला विक्री करत होता. व्हाईट गोल्ड म्हणून ओळख असलेल्या या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. पोलिसांनी यात मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT