लोककला सादर करताना पार्वती सावंत यांचा आगीत होरपळून मृत्यू

 

Dainik Gomantak

गोवा

लोककला सादर करताना पार्वती सावंत यांचा आगीत होरपळून मृत्यू

पार्वती सावंत या लोककलाकर असूनही निवडक कार्यक्रमातच सहभागी होत असत. पण त्यांच्या वाड्यात असणाऱ्या लोककला सादरीकरण पथकात एक महत्त्वाचे काम करणारी महिला नव्हती. तिच्या बदल्यात पार्वती सावंत यांना जावे लागले. नेमके त्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली.

दैनिक गोमन्तक

पणजी: पर्ये-सत्तरी (Porvorim) येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लोककला सादर करताना महिला कलाकाराचा आगीत होरपळून मृत्यू झाला. पार्वती महादेव सावंत (Parvati Sawant) (वय 65) असे त्यांचे नाव आहे. सविस्तर असे की, पर्ये येथील पार्वती सावंत या केरी-सत्तरी येथे लोककला सादरीकरण करत होत्या. या कार्यक्रमात पथकातर्फे ‘धालो’ हा लोककला (folk art) प्रकारात ‘रेमको’ पात्र करण्यासाठी पार्वती यांनी वेशभूषा केली होती. त्याकरिता अंगाभोवती गवत लपेटले होते. कला सादर करताना तिथे असलेल्या समईच्या वातीचा पेट चुकून गवताला लागून आग भडकली.

या आगीत पार्वती 60 टक्के भाजल्या. त्यावेळी काही महिलांनी तेथून पळ काढला तर काहींनी समयसूचकता दाखवत आग आटोक्यात आणली आणि पार्वती यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पार्वती सावंत यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मृत पार्वती सावंत यांचे कुटुंब गरीब आहे. त्या एका नर्सरीत काम करत होत्या. मुलांसह त्यांच्या कमाईवर कुटुंब अवलंबून होते. मात्र, दुर्दैवी घटनेत लोककलाकाराचा मृत्यू झाल्याने सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

राज्यात ठिकठिकाणी समई नृत्य किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम होतात. समई नृत्य सादर करताना पेटलेल्या समई डोक्यावर घेऊन वेगवेगळ्या धोकादायक कृती केल्या जातात. त्यामुळे कार्यक्रम आयोजनावेळी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT