बदललेली जीवनशैली आणि वाढलेले ताण-तणाव यांमुळे भारतीयांचे मानसिक स्वास्थ धोक्यात आले असून ''लांसेट'' या जागतिक मान्यतेच्या आरोग्यविषयक नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या अहवालानुसार या वर्षअखेरीस किमान 9 कोटी भारतीय नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता आहे.
मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात जिल्हा मानसिक स्वास्थ कार्यक्रमांतर्गत परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात ही माहिती देण्यात आली.
यावेळी गोवा आरोग्य खात्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पल्लवी ढाकणे आणि मानसोपचार केंद्रातील परिचारिका विभागाचे साहाय्यक प्राध्यापक विठोबा म्हाळकर यांनी मार्गदर्शन केले. सुमारे 150 कर्मचारी या शिबिरात सहभागी झाले होते.
त्यात मानसोपचारतज्ज्ञ, क्लिनिकल सायकियाट्रिस्ट, प्रशिक्षित परिचारिका, मानसोपचार क्षेत्रातील सामजिक कार्यकर्ते आणि केस नोंदणी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हा विभाग सुरू केला असून मानसिक आरोग्य धोक्यात आलेल्यांना समुपदेशन आणि आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न हे मुख्य उद्दिष्ट ठेवून हा विभाग काम करत आहे.
3.8 कोटी लोकांना पछाडणार भयगंड
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सध्या भारतात मानसिक रुग्णांची वाढ होत असून या वर्षअखेर अनेक नागरिक नैराश्याच्या गर्तेत येतील.
सुमारे 3.8 कोटी लोक भयगंडाने पछाडण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अशी परिस्थिती गोव्यात उद्भवल्यास रुग्णांवर त्वरित कसे उपचार करता येतील, याचे प्रशिक्षण या शिबिरात देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.