Goa Budget 2023 : गोव्याचा यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक : दामू नाईक

राज्य सरकार खाण व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात
Damu Naik
Damu NaikDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक, विकासाला चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींमुळे खालच्या स्तरावरील घटकांनाही त्याचा लाभ होईल. हा अर्थसंकल्प गोव्याला स्वयंपूर्ण बनवून सामान्यांना दिलासा देणारा आहे, असे भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी सांगितले.

मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत दक्षिण गोवा भाजप जिल्हाध्यक्ष तुळशीदास नाईक तसेच सचिव सर्वानंद भगत उपस्थित होते.

यावेळी नाईक म्हणाले, गोव्यात होणाऱ्या जी-20 बैठकांसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचा पर्यटन, आरोग्य व इतर क्षेत्रांना फायदा होईल. शिक्षण क्षेत्रासाठी, खास करून नव्या राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी या अर्थसंकल्पात प्राधान्य दिले आहे.

Damu Naik
Zilla Panchayat : जिल्हा पंचायतीच्या विकास आराखड्याचे 24 रोजी अनावरण : नाईक

कानाकोपऱ्यात पोचणार बस

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी केलेली 225 कोटी रुपयांची तरतूद क्रीडा क्षेत्राच्या विकासाला गती देणारी ठरेल. राज्य सरकार खाण व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

तसेच खासगी मालकांच्या बसेस कदंबतर्फे चालवण्यास घेतल्या जातील. त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे गोव्याच्या कानाकोपऱ्यात बस वाहतुकीला वाव मिळेल, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com