Where water goes from Cortalim Dainik Gomantak
गोवा

कुठ्ठाळीचे पाणी जातेय कुठे?

ॲन्थोनी वाझ: वेर्णा, सांकवाळला पाणी वळविल्याचा संशय

दैनिक गोमन्तक

वास्को: कुठ्ठाळी मतदारसंघ सध्या पाणीटंचाईने ग्रासला आहे. या ठिकाणी पाणी टंचाई वारंवार जाणवत आहे. कुठ्ठाळीच्या वाट्याचे पाणी वेर्णा व सांकवाळ औद्योगिक वसाहतींकडे वळविल्याचा संशय असल्याने सर्व व्हॉल्वची तपासणी करण्यात येणार असल्याचा इशारा देत कुठ्ठाळीतील पाणी समस्या दूर करण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कुठ्ठाळीचे नवनिर्वाचित आमदार ॲन्थोनी वाझ यांनी दिली.

आमदार वाझ म्हणाले, कुठ्ठाळी मतदारसंघातील काही भागात पाणीपुरवठा न झाल्याने लोकांच्या तक्रारी माझ्याकडे वारंवार येत असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी शुक्रवारी बैठक घेण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत सर्व व्हॉल्व तपासून कुठ्ठाळीचे पाणी नेमके जाते कुठे, याचा तपास केला जाईल, असे ते म्हणाले.

आमच्या वाट्याचे पाणी आम्हालाच हवे

कुठ्ठाळीतील पाणी टंचाई लवकर दूर होण्याची गरज असल्याने आम्ही काही सूचना पाणी विभागाच्या अभियंत्यांना केल्या आहेत. वास्को, दाबोळी, आगशी, कुठ्ठाळी व इतर भागांना किती पाणीपुरवठा होतो, यासंबंधी आढावा घेणार आहे. कुठ्ठाळीमार्गे आगशीला जलवाहिनी घालण्यात आली आहेत. कुठ्ठाळीला पाणीपुरवठा केल्यावर व्हॉल्व बंद करून आगशीला पाणीपुरवठा करण्यासाठी त्या बाजूचा व्हॉल्व सुरू करण्यात येतो. परंतु आम्हाला पाणी कमी मिळते. आमच्या वाट्याचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. आम्ही इतरांना पाणी देऊ नका, असे म्हणत नाही. परंतु आम्हाला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करा, असे आमदार वाझ यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT