फोंडा: तिस्क - उसगाव (Tiska Usgao) येथील परिसर घनदाट वस्तीने व्यापलेला आहे. मात्र, येथे कोरोनामुळे मृत्यू (Coronavirus) झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने लोकांची परवड होत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांसमोर निर्माण होतो. स्थानिक गोमंतकीय मृतदेहांवर कसलये डोंगरमाथ्यावर अंत्यसंस्कार केले जातात, तर बिगर गोमंतकीय कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे म्हणजे खर्चिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मरणही महागडे होत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत. (Goa: Where to bury covid's body?)
तिस्क - उसगाव भागात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दगावलेल्या मृत कोविड मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी कुठे न्यायचे, असा प्रश्न लोकांसमोर निर्माण होत आहे. स्थानिकांना स्मशानभूमी आहे. बिगर गोमंतकीय लोकांना स्मशानभूमीअभावी गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ज्याच्या कुटुंबियांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने फोंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पैसे कुठून भरावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. सार्वजनिक स्मशानभूमी अभावी कोविड बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना समस्यांचे विघ्न पार पाडावे लागत आहे.
स्थानिकांवर कसलये डोंगरावर अंत्यसंस्कार
तिस्क - उसगाव येथील कसलये येथील एका डोंगर माथ्यावर अडगळीच्या ठिकाणी कुमेरी जमिनक्षेत्रात स्थानिकांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. मात्र, तेथे सोपस्कारासाठी लागणारी सामग्री नेण्यासाठी कच्चा रस्ता असल्याने वाहने जिकरीचे बनत आहे. त्यामुळे भाड्याच्या वाहनातून अंत्यसंस्कारासाठी साहित्य नेण्यासाठी कसरत करावी लागते.
फोंड्यातील मुक्तिधामच पर्याय
तिस्क - उसगाव येथे दुसऱ्या महामारीच्या लाटेत उपचार घेणारे दहापेक्षा अधिक कोविड रुग्ण दगावले असून त्यांचा अंत्यविधी फोंडा येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत करावा लागत आहे. फोंडा येथील मुक्तिधाम येथे प्रतिदिनी सहाजणांवर अंत्यसंस्कार करावे लागत असून त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेहांची परवड होत आहे. एकेदिवशी थांबून दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याची पाळी मृतांच्या कुटुंबियावर येत आहे. कोविड महामारीच्या लाटेत घरातील कर्ताच गेल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे. सर्वसामान्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. त्यातच कोविडग्रस्त रुग्णांच्या कुटुंबियांना स्मशानभूमीअभआवी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाळपई मतदारसंघाचे आमदार तथा विश्वजित राणे यांनी यात जातिनिशी लक्ष घालून सार्वजनिक स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्याची मागणी कोविडग्रस्त रुग्णांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.