Kala Academy Goa

 

Dainik Gomantak

गोवा

कला अकादमीचे काम कधी पूर्ण होणार?

पणजी कला अकादमीमध्ये (Kala Academy Goa) सुरू असलेले दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम जून 2022 पर्यंत 365 दिवसांच्या निर्धारित कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे अकादमीचे सदस्य सचिव डॉ. प्रवीण यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Kala Academy Goa: पणजी हे शहर गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शहर आहे. कारण शहरामध्येच राज्यातील महत्वाची शासकीय कार्यालये, इतर कार्यालये उपस्थित आहेत. गोव्यातील लोकांना आणि पर्यटकांना गोव्यातील जवळजवळ सर्वच गोष्टी, ठिकाणे आवडतात. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे इथे असलेली ‘कला अकादमी’. या कला आकादमीमध्ये आजवर अनेक महान नाटकांचे प्रयोग झाले आहेत. पण या वास्तूचे काही कालावधीपासून कामकाज सुरू होते. हे कामकाज कधी पूर्ण होणार असा प्रश्न संगळ्याना पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार आता कला अकादमीचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पणजी कला अकादमीमध्ये (Kala Academy Goa) सुरू असलेले दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम जून 2022 पर्यंत 365 दिवसांच्या निर्धारित कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आणि सध्या 50% काम पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये इमारतीचे पुन्हा मजबुतीकरण समाविष्ट आहे, अशी माहिती कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. प्रवीण यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘राजधानी शहराच्या मध्यभागी असलेली ही प्रतिष्ठित रचना विविध प्रकारच्या कला सादर करण्यासाठी सर्वात आवडती सार्वजनिक जागा आहे, प्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांच्या सर्वात प्रतिष्ठित प्रकल्पांपैकी एक आहे, आणि या जागेची दुरुस्ती, पुनर्संचयित आणि सर्व काळजी घेण्यात आली आहे.’ इमारतीचे सौंदर्य टिकवून ठेवत आणि संरचनेचा कोणताही भाग न पाडता नूतनीकरण करणार असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘शासनाप्रमाणे कला अकादमीच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून दुरुस्ती करून मूळ इमारतीचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवू. स्लॅबचे वॉटरप्रूफिंग पूर्ण झाले आहे. आणि सध्या जतन आणि देखभालीसाठी नूतनीकरण सुरू आहे. इथे ओपन एअर ऑडिटोरियमसह कोणत्याही प्रकारची कोणतीही पडझड झालेली नाही. या वर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला कला आणि संस्कृती मंत्री आणि कला अकादमीचे अध्यक्ष यांनी घोषणा केली होती की जून 2021 मध्ये दुरुस्ती आणि नूतनीकरण सुरू झाले होते. ते काम 10 महिन्यांत, फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण होईल.

या कामाला तसा विलंब झाला. बांधकामात वापरण्यात आलेला लॅटराइट दगड कालांतराने खराब झाल्याने बांधकाम नाजूक बनल्याने हे काम संथ गतीने करावे लागले आणि त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू ठेवताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. लॅटराइट दगड बदलणे आवश्यक आहे, असे सचिव डॉ. प्रवीण म्हणाले. त्यामुळे आता हे काम लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT