लोहिया मैदानाच्या दुरुस्ती कामाला वेग Dainik Gomantak
गोवा

ऐतिहासिक लोहिया मैदानाचे काम कधी पूर्ण होणार?

लोहिया मैदानाच्या दुरुस्ती कामाला वेग, मात्र पुर्ण कधी होणार सांगणे कठीण

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मडगाव येथील लोहिया मैदानाला ऐतिहासिक महत्व आहे. या मैदानावरुनच गोव्याच्या मुक्ती संग्रामाला जून 1946 सुरुवात झाली. पण गेल्या अनेक वर्षांपासुन या मैदानाची काया बिघडली होती. दुरुस्तीची आवश्यकता भासत होती. गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकानी या मैदानाच्या दुरुस्तीचा विषय धसास लावला. शेवटी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई (Vijai Sardesai) नगर विकास मंत्री असताना 2018 साली दुरुस्ती कामाला मंजुरी मिळाली व त्यासाठी 2 कोटी रुपया मंजुरही झाले. पण प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामाला 2019 सालीच सुरुवात झाली. मात्र तेव्हापासुन दुरुस्तीचे काम ह्या ना त्या कारणामुळे रखडत गेले.

गोव्याने मुक्तीची (Goa Liberation) 60 वर्षे 2021 साली साजरी केली. 19 डिसेंबर 2021 पर्यंत काम पुर्ण होईल अशी अपेक्षा होती पण ते झाले नाही. आता कामाला गती प्राप्त झाली असले तरी आ्णखी नेमके किती दिवस किंवा महिने लागतील हे कोणीही सांगु शकत नाहीत. या मैदानाच्या दुरुस्तीचे काम गोवा स्टेट अर्बन डेव्हलॉपमेंट एजन्सीकडे (सुडा) सोपविण्यात आले आहे.

या प्रतिनिधीने लोहिया मैदानाला भेट दिली तेव्हा दुरुस्तीच्या कामाला वेग आल्याचे दिसून आले. काही मजूर रंगमंचाचे, काही मजुर बसण्याच्या गॅलरीचे काम तर काही जण फरशी बसवण्याचे तर काही मजुर भिंत बांधण्याचे काम करीत होते.

जेव्हा या मैदानाच्या दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आले तेव्हा त्चाचा आराखडा तयार करताना मैदानावर गोवा मुक्तीसंग्रामाची माहिती देणारे कला दालन, चालण्याचा ट्रॅक, बसण्यासाठी बेंच, दिवाबत्ती, रंगमंच दुरुस्ती, ग्रीन रुम, स्वच्छतागृह, मुतारी, जमनीवर फरशा, डॉ. लोहियाच्या पुतळ्याच्या वर पाऊस व ऊनापासुन संरक्षण मिळण्यासाठी झांकण, वगैरेची सुविधा नमुद करण्यात आली होती.

यातील नेमके किती काम पूर्ण झाले आहे हे नक्कीच सांगता येत नाही. मध्यंतरी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यानी या मैदानाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आश्र्वासन दिले होते. तसेच विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व आमदार विजय सरदेसाई यानी डॉ. लोहिया यांचा पुतळा कोणीतरी पळवला असे सांगुन गोंधळात गोंधळ केला. शेवटी सुडाने हा पुतळा सुरक्षीत असल्याचे स्पष्ट करुन परिस्थिती सावरली.

सद्या कामाचा वेग पाहता लोहिया मैदानाच्या दुरुस्तीचे काम सहा ते सात महिन्यात पुर्ण होण्याची शक्यता दिसते. कदाचीत नव्या सरकाराकडून त्याच रितसर उदघाटन होण्याची शक्यता वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Retirement: क्रिकेटपटूची तडकाफडकी निवृत्ती! Asia Cup 2025 पूर्वी 'या' खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास रोखलं म्हणून गोळी घातली; अमेरिकेत भारतीय तरुणाचा खून

Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

Rohit Sharma: मुंबईच्या राजाला झालंय तरी काय? 'हॉस्पिटल'मधल्या व्हिडिओमुळं चाहते टेन्शनमध्ये Watch Video

SCROLL FOR NEXT