WhatsApp Friend online Fraud case Dainik Gomantak
गोवा

WhatsApp Scam: व्हॉट्सअपवर 'मी सुरज बोलतोय...' म्हणत रचला कट; मित्र असल्याचे भासवून पुण्यातील महिलेने लुटले 10 लाख, वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

WhatsApp Friend Fraud: आपला मित्र असल्याचे भासवून पुणे येथील शुभांगी हिने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आल्त बोगमाळो येथील विवेक यांनी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: आपला मित्र असल्याचे भासवून पुणे येथील शुभांगी हिने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आल्त बोगमाळो येथील विवेक यांनी केली आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ ला शुभांगी हिने विवेकला व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठविला होता. त्यामध्ये आपण सुरज असल्याचे तिने भासविले. आपणास (सुरजला) पैशाची तातडीची गरज असल्याचे सांगून नेटबँकिंगच्या माध्यमातून एका बँकेच्या खात्यात दहा लाख रुपये जमा करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार विवेकने दहा लाख रुपये शुभांगीने (सुरज) सांगितलेल्या बँकेत हस्तांतरित केले. त्या बँकेत जमा झालेले पैसे शुभांगी हिने वैयक्तिक वापरासाठी वापरले.

जेणेकरून आपली फसवणूक व आर्थिक नुकसान झाल्याचे विवेक यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निखिल देसाई पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT