Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

एक्झिट पोल काहीही येऊदेत, गोव्यात भाजपचीच सत्ता : प्रमोद सावंत

आमदार फुटण्याच्या भीतीने काँग्रेसचं रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरु असल्याचा मुख्यमंत्र्यांचा टोला

दैनिक गोमन्तक

पणजी : एक्झिट पोलचे निकाल काहीही असुदेत, मात्र गोव्यात भाजपचंच सरकार येणार असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. मात्र असं असलं तरीही गोव्यातील मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला कमी मिळणाऱ्या जागा दिसत असल्याने भाजपकडून आता सत्तास्थापनेसाठीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळताना दिसत आहेत. (Goa CM Pramod Sawant News Updates)

एक्झिट पोलचे आकडे काही खरे नसतात, तो अंदाज असतो. त्यामुळे एक्झिट पोलमधील आकडेवारी खोटी ठरेल आणि गोव्यात पुन्हा भाजपचंच (BJP) सरकार येणार असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. भाजप निकालाला घाबरत नाही, कारण आपण गोव्यात तशी विकासकामं केली आहेत. त्यामुळे गोव्याची (Goa) जनता आम्हालाच निवडून देणार असा दावाही मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केला आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्याच मनात जास्त भीती आहे, त्यामुळे काँग्रेसकडून रिसॉर्ट पॉलिटिक्स खेळलं जात असल्याचा टोलाही मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी लगावला आहे. काँग्रेसच्या (Congress) मनात कायमच भीती असते. याही निवडणुकीत ती दिसून येत आहे. यावेळी काँग्रेसने जे उमेदवार दिलेत, त्यावरुन काँग्रेस नेत्यांच्या मनात पराभवाची भीती आहे. म्हणूनच त्यांना रिसॉर्टमध्ये लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने चालवला आहे, अशी टीकाही प्रमोद सावंतांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT