Nawab Malik Dainik Gomantak
गोवा

गोव्यासाठी राष्ट्रवादीचा अजेंडा काय? नवाब मलिक म्हणतात..

गोव्याला भाजप सरकारने ड्रग्सचा कारखाना बनवल; नवाब मलिक

दैनिक गोमन्तक

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. अनेक राजकीय नेते गोव्यात तळ ठोकून आहेत. राजकीय पक्षांमध्ये जाहीरनामा आणि आश्वासणे देण्याची जणू स्पर्धाचं रंगली आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दैनिक गोमन्तकशी बोलताना गोव्याबद्दलची राजकीय भूमिका मांडली आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील काही योजना सांगितल्या, यात प्रामुख्याने फॅमिली ट्रीप बद्दल सांगताना ते म्हणाले की, गोव्यातील जनतेला रोजगार मिळावा यासाठी आम्ही याची निर्मिती करत आहोत. गोव्यात ज्यांच्याकडे लहान मोठी घर आहेत, त्यांना आम्ही हॉटेलचा परवाना देणार आहोत. यामुळे गोवेकर आपल्या घरच्या चार रूमपैकी दोन रूम गेस्टसाठी देतील. त्यासोबत त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय होईल. यातून त्यांना रोजगार मिळेल आणि यासाठी आम्ही लवकरच एक वेबसाइट बनवू. जेणेकरून पर्यटकांना देखील गोवा ट्रीप परवडेल.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी गोव्यातील शेतकरी वर्ग हा मोठ्या अडचणीत आहे. इथे बारा महीने शेती पिकत नाही, यासाठी आम्ही झोडधंदा निर्मिती प्रकल्प राबवणार आहोत. यामध्ये कुकुटपालन, गाय गोटा योजना राबवणार आहोत. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील सरकार करेल. राज्यातील भाजप (BJP) सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार नसून त्यांचा भर हा फक्त कसिनो आणि पर्यटणावर आहे. तसेच गोव्याला भाजप सरकारने ड्रग्सचा कारखाना बनवल आहे. यातून अनेक तरुण हे वेसनाधीन होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport Taxi Protest: मोपा टॅक्सी आंदोलन प्रकरणी आमदार सरदेसाईंसह 54 जणांवर गुन्हे दाखल; 15 जूनला चौकशीसाठी पाचारण

Goa Politics: 'प्रभाग आरक्षणाचे निकष स्पष्ट करा, अन्यथा कोर्टात खेचू' सरदेसाईंचा सरकारला इशारा; पालिका निवडणुकीत 'रडीचा डाव' खेळू देणार नाही

Vagator Drug Case: वागातोर ड्रग्ज मृत्यू प्रकरणी हणजूण पोलिसांची इंदूरवारी! तपासात सहकार्य न करणाऱ्या मित्रांच्या रक्ताचे घेतले नमुने; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सायबर फसवणुकीचे मोठे सिंडिकेट उद्ध्वस्त! 77 कोटींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, 16 जणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; गोव्‍यातून नऊजण ताब्‍यात

Today’s Horoscope: बुधवारचा दिवस 'या' 5 राशींसाठी 'लकी'! रखडलेली कामे मार्गी लागणार अन् उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार; भाग्याचीही मिळणार भक्कम साथ

SCROLL FOR NEXT