Dog Temple Goa Instagram
गोवा

Dog Temple Goa: महिन्याला एक लाख रुपये भाडं देऊन विदेशी महिला चालवत असलेले गोव्यातील 'डॉग टेम्पल' काय आहे?

Dog Temple In Goa: एक विदेशी महिला महिन्याला भाड्यापोटी एक लाख रुपये देऊन ७० कुत्र्यांचा सांभाळ करत आहे.

Pramod Yadav

गोवा तसं भारताचे पर्यटन राज्य, देशातच नव्हे तर विदेशात देखील त्याची ख्याती सुंदर समुद्रकिनारे, नयनरम्य निसर्ग आणि प्रगल्भ ऐतिहासिक वारसा अशीच आहे.

पण, गोव्यात अनेक सामाजिक संस्था देखील कार्यरत आहेत. गोव्यात एका विदेशी महिलेने कुत्र्यांसाठी हक्काचं घर उभारलं असून, त्याची चर्चा थेट विधानसभेत एका लक्षावेधी दरम्यान झाली

राज्यातील भटक्या कुत्र्यांपासून होणारा त्रास आणि निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आज लक्षवेधी मांडली. आणि राज्य सरकारने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी. यावर विविध आमदारांनी त्यांची मते मांडत विविध सूचना केल्या.

दरम्यान, यावेळी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी समस्येवर भाष्य करताना त्यांच्याच मतदारसंघात असलेल्या डॉग हाऊसची माहिती दिली. एक विदेशी महिला महिन्याला भाड्यापोटी एक लाख रुपये देऊन ७० कुत्र्यांचा सांभाळ करत असेल तर सरकारला का जमत नाही असा सवाल आरोलकर यांनी उपस्थित केला.

काय आहे डॉग टेम्पल?

मांद्रे-हरमल सीमेवर गिरकरवाडो येथे इन्गो या जर्मन महिलेने डॉग टेम्पलची स्थापना केली आहे. साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी या टेम्पलची स्थापना करण्यात आली असून, येथे ७० श्वान आहेत.

काही कुत्र्यांना अंधत्व आले आहे तर काहींना मारहाण झाली असून, काही श्वानांना मूळ मालकांनी सोडून दिलंय, अशा कुत्र्यांचा सांभाळ येथे केला जातो.

कुत्र्यांना येथे पूर्णपणे मोकळे सोडले जाते, त्यांचे लसीकरण किंवा कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा असेल ती वेळोवेळी केली जाते, अशी माहिती डॉग टेम्पलच्या वतीने एका वृत्तपत्राला देण्यात आली.

गोवा विधानसभेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी आमदार आमोणकरांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरुन लक्षवेधी मांडली. यावर चर्चा करताना जीत आरोलकर, विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगस, चंद्रकांत शेट्ये यांनी मत आणि सूचना केल्या.

आरोलकरांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीची ही महिला मांद्रे येथील डॉग टेम्पल चालविण्यासाठी महिन्याला एक लाख रुपये देत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तर सरकार कुठे कमी पडतंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT