गोव्यात चायनीज ग्लोफेस्ट-द लँटर्न फेस्टिव्हलवरुन वाद होत आहे. मोरजी समुद्रकिनाऱ्यावर रविवारी (दि.25 मे) संध्याकाळी होणाऱ्या या उत्सवाबाबत पर्यावरणपादी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
चीनमध्ये साजऱ्या होणाऱ्या लँटर्न महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात देखील हा उत्सव साजरा केला जातो. या अनेक लोक एकत्र येत कागदी कंदील आकाशात सोडून आनंद साजरा करतात.
गोवा पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महोत्सवासाठी परवानगी बाबत विभागाकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज प्राप्त झाला नाही. तसेच, पर्यावरणाला हाणीकारक ठरणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
द लँटर्न फेस्टिव्हलमुळे समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक परिसंस्था, वन्यजीव आणि सागरी जीवनाला गंभीर धोका निर्माण होईल, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त करत महोत्सवाला विरोध केला होता.
मोरजी समुद्रकिनारा संरक्षित ऑलिव्ह रिडले कासवांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. याठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर घरटी बनवली आहेत.
महोत्सावाच्या निमित्ताने समुद्रकिनाऱ्यावर दिवे, आवाज आणि मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाल्याने कासवांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.
समुद्रकिनाऱ्यावर 10 हून अधिक ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी आहेत. हे कागदी कंदील बांबू किंवा धातूच्या तारांच्या चौकटीपासून बनवलेले असतात. कंदील जाळ्यासारखे असल्याने वन्यजीव, मासे, डॉल्फिन, पक्षी आणि कासव त्यांना गिळू शकतात किंवा त्यात अडकण्याची शक्यता असते.
कंदील जैवविघटनशील असले तरी त्यांचे विघटन होण्यास अनेक महिने लागतात. कागदी कंदील पेटत्या आगीसोबत आकाशात सोडणे देखील धोकादायक आहे कारण झोपड्या, घरे आणि नारळाच्या झाडांना आग लागू शकते. यामुळे वन भागात देखील आग लागू शकते.
दरम्यान, कंदील वायरद्वारे बांधले जातील आणि केवळ 100 फूट वरपर्यंत उडवले जातील, त्यांना परत त्याचठिकाणी आणले जाईल. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. कार्यक्रमानंतर कार्यक्रमस्थळाची स्वच्छताही केली जाईल, असे स्पष्टीकरण कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.