Vijai Sardesai alleges on Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2023: मुख्यमंत्री कर्नाटकात जाऊन कन्नडमध्ये नेमके काय बोलले? आमदार विजय सरदेसाईंचा सवाल

म्हादई दिल्याचे कबूल केले का? डीपीआरमध्ये पर्यावरणविषयक परवानग्या दिल्याचा उल्लेख

Akshay Nirmale

Goa Budget Session 2023: माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कर्नाटकातील भर सभेत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन म्हादई कर्नाटकला दिल्याचे घोषित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकात जाऊन कन्नडमध्ये भाषण केले.

मुख्यमंत्री नेमके काय बोलले? की त्यांनीही गृहमंत्र्यांच्या वक्तव्याला दुजोरा म्हादई दिल्याचे सांगितले, ते सांगावे, असा सवाल आज, मंगळवारी विधानसभेत आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

(Vijai Sardesai On Mahadayi issue in Goa Assembly Session 2023)

आमदार सरदेसाई म्हणाले की, कर्नाटकच्या डीपीआरची प्रत मिळाली पण त्याला गोवा सरकारने आव्हान दिलेले नाही. सरकारने डीपीआर वाचला आहे का? त्यात चॅप्टर नाईन टू मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 17 ऑक्टोबर 2019 च्या पत्राचा हवाला देत पर्यावरणीय परवानग्यांमधून सूट दिल्याचे म्हटले आहे. आणि याची आपल्या कुणालाच काहीही माहिती नाही.

म्हणजेच म्हाईदचे पाणी वळविण्याला आधीच पर्यावरणीय परवानग्या दिल्या गेल्या आहेत. कर्नाटकच्या डीपीआरमध्ये तसे म्हटले आहे. आणि तरी या डीपीआरला आव्हान दिले जात नाही. याबाबत सविस्तर माहिती दिली गेली पाहिजे.

माझा प्रश्न हाच आहे की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी केवळ निवडणुकीसाठी म्हणून भाषण केले की, खरोखरंच त्यांच्या म्हणण्यानुसार म्हादई कर्नाटकला दिली आहे? कारण त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री कर्नाटकात गेले. तिथे ते कन्नडमधून बोलले. ते काय बोलले मला समजले नाही.

मला कन्नड समजत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगावे की, त्यांनी कन्नडमधून कर्नाटकवासीयांना नेमके काय सांगितले. की त्यांनीही गृहमंत्र्यांच्या भाषणानुसार म्हादईचे पाणी कर्नाटकला दिले म्हणून सांगितले? मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. म्हादईचे पाणी वळविण्याबाबत कर्नाटकला कधीही मंजुरी दिली नाही, यापुढेही देणार नाही. तसेच कन्नडमधून म्हादईचे पाणी देण्याबाबत काहीही वक्तव्य केले नाही, असे स्पष्ट केले.

त्यावर, याचा अर्थ केंद्रीय गृहमंत्री खोटे बोलत आहेत का, ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानुसार गृहमंत्री खोटे बोलले असाच अर्थ होतो, असा टोलाही सरदेसाईंनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT