Goa Taxi APP | Minister Mauvin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: टॅक्सीच्या 4000 रूपये भाड्याबाबत काय म्हणाले वाहतूक मंत्री गुदिन्हो

कारच्या वेगवेगळ्या चार श्रेणी असल्याचे स्पष्टीकरण

Akshay Nirmale

Goa Taxi: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लाईटमधून उतरलेल्या एका पर्यटकाला मोपा ते बाणावली या टॅक्सी प्रवासात चार हजार हून अधिक रूपये भाडे द्यावे लागले होते. त्या प्रवाशाची टॅक्सी भाड्याची पावती सोशल मीडियात व्हायरल झाली होती. त्यावरून आता राज्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, जो मुद्दा खरी समस्या नाही, त्याच मुद्याला मोठे बनविण्याचा प्रयत्न आजकाल काहीजणांकडून सुरू आहे. ज्या पर्यटकाची पेमेंट स्लिप व्हायरल झाली होती, त्याने उच्च श्रेणीची टॅक्सी निवडली होती, त्यामुळे त्या टॅक्सीचे शुल्क जास्त होते. वेगवेगळ्या दरांसह टॅक्सीच्या एकूण 4 श्रेणी आहेत. आम्ही आता एकूण बिलावरील सेवा शुल्क कमी करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही गुदिन्हो यांनी दिले.

रोहन गोवेकर या प्रवाशाला मोपा ते बाणावली या टॅक्सी प्रवासासाठी तब्बल 4180 रूपये भाडे द्यावे लागले. गोवेकर यांनी त्यांची टॅक्सीच्या प्रवासी भाड्याची रिसीट सोशल मीडियात शेअर केली आणि ती व्हायरल झाली होती. गोवेकर यांनी शेअर केलेल्या रिसीटमध्ये दिसते की मोपा ते बाणावली हे अंतर 65.86 किलोमीटर इतके आहे. यात टॅक्सीचे भाडे 3227.14 रूपये, सर्व्हिस फी 484.07 रूपये, एअरपोर्ट चार्जेस 160 रूपये आणि जीएसटी 161.36 आणि 115.93 रूपये असे मिळून 4148.50 रूपये बिल आले आहे. त्यावर नेटीझन्सकडून विमान तिकीटाचे दर जास्त की टॅक्सीभाडे जास्त असा सवाल केला जात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT