Goa Vs W Bengal T20 Dainik Gomantak
गोवा

Goa Vs W Bengal T20: गोव्याचा बंगालकडून सात विकेट आणि 23 चेंडू राखून पराभव

अर्जुन तेंडुलकरने फटकेबाजी केल्यामुळे गोव्याला ८ बाद १४० वरून आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

किशोर पेटकर

Goa Vs W Bengal T20: पुदुचेरीतील आंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धेद्वारे मोसमपूर्व सराव करणाऱ्या गोव्याच्या गोलंदाजीतील दुबळेपण सलग तिसऱ्या सामन्यातही कायम राहिले. त्यामुळे त्यांना बंगालकडून सात विकेट आणि तब्बल २३ चेंडू राखून पराभव पत्करावा लागला.

फलंदाजीत पाहुण्या राहुल त्रिपाठीची लौकिकास साजेशी फटकेबाजी, तसेच कश्यप बखलेचा चमकदार फॉर्म यामुळे गोव्याने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर सर्वबाद १७१ धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता गोव्याच्या अन्य फलंदाजांना चमक दाखविता आली नाही. तळात अर्जुन तेंडुलकरने फटकेबाजी केल्यामुळे गोव्याला ८ बाद १४० वरून आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

अर्जुनने २२ चेंडूंत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने २९ धावा केल्या. त्यापूर्वी राहुल (४५ धावा, २६ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) व कश्यप (३१ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची, तर नंतर कश्यप व कर्णधार दर्शन मिसाळ (१६) यांनी चौथ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली.

बंगालच्या डावात अभिमन्यू ईश्वरन व सुदीप घरामी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची, तर सुदीप व रंज्योत सिंग यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करून संघाला सोपा विजय मिळवून दिला. सुदीप याने ६४ धावांच्या नाबाद खेळीत ३८ चेंडूंचा सामना करताना सहा चौकार व तीन षटकार लगावले. आक्रमक रंज्योत याने अवघ्या २१ चेंडूंत दोन चौकार व चार षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा: २० षटकांत सर्वबाद १७१ (ईशान गडेकर ४, राहुल त्रिपाठी ४५, सुयश प्रभुदेसाई ९, कश्यप बखले ४४, दर्शन मिसाळ १६, दीपराज गावकर ४, अर्जुन तेंडुलकर २९, तुनीष सावकार ०, लक्षय गर्ग १, समर दुभाषी १२, विकास सिंग नाबाद १, ईशान पोरेल ४-०-३५-३, कौशिक मैती ४-०-२४-२, प्रदिप्ता प्रामाणिक ३-०-२८-२)

पराभूत वि. बंगाल: १६.१ षटकांत ३ बाद १७२ (अभिमन्यू ईश्वरन ३६, सुदीप घरामी नाबाद ६४, रंज्योत सिंग ४३, लक्षय गर्ग २-०-३०-०, अर्जुन तेंडुलकर ३-०-३०-०, शुभम तारी २-०-३०-१, विकास सिंग ४-०-३३-०, दर्शन मिसाळ ४-०-२७-२, सुयश प्रभुदेसाई १-०-१४-०, कश्यप बखले ०.१-०-१-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Porascade Junction Accident: पोरस्कडे जंक्शनाकडेन भिरांकूळ अपघात

SCROLL FOR NEXT