फुटबॉल महासंघाची विभागीय फुटबॉल स्पर्धा; धेंपो आणि स्पोर्टिंग क्लबकडे गोव्याचे प्रतिनिधित्व

AIFF तृतीय विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी एकूण नऊ राज्य फुटबॉल संघटनांनी संघांची शिफारस केली.
All India Football Federation Goa
All India Football Federation GoaDainik Gomantak
Published on
Updated on

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) तृतीय विभागीय फुटबॉल स्पर्धेत गतवेळचा गोवा प्रोफेशनल लीग विजेता धेंपो स्पोर्टस क्लब आणि उपविजेता स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ गोव्याचे प्रतिनिधित्व करतील. या दोन्ही संघांची शिफारस गोवा फुटबॉल असोसिएशनतर्फे (Goa Football Federation) करण्यात आली.

एआयएफएफ तृतीय विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी एकूण नऊ राज्य फुटबॉल संघटनांनी संघांची शिफारस केली.

गोव्याव्यतिरिक्त छत्तीसगडचे आरकेएम फुटबॉल अकादमी व न्यू फ्रेंड्स क्लब दांतेवाडा, दिल्लीतील वाटिका एफसी व गढवाल एफसी, गुजरातचे बडोदा एफए व एआरए एफसी, कर्नाटकचे स्पोर्टिंग क्लब बंगळूर व किकस्टार्ट एफसी, पंजाबचे इंटरनॅशनल फुटबॉल क्लब फगवाडा व दोआबा युनायटेड एफसी, मध्य प्रदेशचा लेक सिटी एफसी, राजस्थानचा जयपूर एलिट एफसी व महाराष्ट्राचा मिल्लात एफसी हे संघ तृतीय विभागात असतील.

All India Football Federation Goa
'द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूरलाही भेट द्यावी', राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्यावरून काँग्रेसची खोचक टीका

एआयएफएफ लीग समितीची बैठक मंगळवारी नवी दिल्ली येथे झाली. त्यावेळी जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी गोव्याचे प्रतिनिधित्व केले.

आगामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील संघ आता 30 ऐवजी 35 खेळाडू करारबद्ध करून शकतील. लीग समितीने संघातील युवा खेळाडूंची संख्याही वाढविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आय-लीग स्पर्धेतील संघाला आठ 22 वर्षांखालील खेळाडू करारबद्ध करावे लागतील.

आय-लीग क्लब सहा परदेशी खेळाडू करारबद्ध करू शकतील. त्यापैकी एक आशियाई महासंघ संलग्न असेल. प्रत्येक सामन्यात एका आशियाई खेळाडूसह चार परदेशी खेळाडू खेळविता येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com