Taxi Operators AT Porvorim Police Station  Dainik Gomantak
गोवा

Taxi Driver Assault: कारची कारला धडक, शाब्दीक वादानंतर पश्चिम बंगलाच्या पर्यटकांकडून टॅक्सी चालकाला मारहाण

Goa Crime News: पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या पश्चिम बंगाल येथील पर्यटकांच्या कारने जेकीम डिसोझा यांच्या टॅक्सीला धडक दिली.

Pramod Yadav

पर्वरी: कारने कारला धडक दिल्याने पर्यटक आणि टॅक्सी चालक यांच्यात वाद झाला. यात पर्यटकांनी टॅक्सी चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना एलपीके रोड, नेरुळ येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी पश्चिम बंगालच्या पर्यटकांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या पश्चिम बंगाल येथील पर्यटकांच्या कारने जेकीम डिसोझा यांच्या टॅक्सीला धडक दिली. यात डिसोझा यांच्या कारचे नुकसान झाले. यावरुन डिसोझा आणि पर्यटक यांच्यात शाब्दिक वाद झाला. डिसोझा यांनी मागणी केलेली नुकसान भरपाई देण्यास पर्यटकांनी नकार दिल्यानंतर झिसोझा यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.

या घटनेनंतर आक्रमक झालेल्या टॅक्सी चालकांना पर्वरी पोलिस स्थानकाबाहेर गर्दी करत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी संशयित पश्चिम बंगालच्या पर्यटकांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान, पर्यटकांनी केलेल्या मारहाणीत टॅक्सी चालक डिसोझा यांच्या डोळ्याला दुखापत झालीय.

गेल्या काही दिवसांपूर्वी पर्यटकांनी ऑनलाईन टॅक्सी का बुक केली यावरुन दोन टॅक्सी चालकांमध्ये पर्रा येथे वाद झाला होता. यात दोन्ही टॅक्सी चालक एकमेकांशी वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरुन पर्यटकांनी यात आमचा काय दोष असा सवाल देखील उपस्थित केला होता. शिवाय असे होत असल्यास पर्यटक गोव्यात येणार नाहीत, असे देखील पर्यटक या व्हिडिओत बोलताना दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT