Well Collapsed In Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: शेट्येवाडा म्हापसा येथे विहिरीची भिंत कोसळली ; दुचाकी बुडाली, घर धोक्यात

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

Pramod Yadav

Well Collapsed In Mapusa: गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे विविध भागात पाणी साचणे, झाडे, घरांची पडझड होण्याच्या घटना समोर येत आहेत. शेट्येवाडा, म्हापसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून, विहिरीची भिंत कोसळली आहे. बुधवारी (दि.28) पहाटे साडे सहा वाजता ही घटना घडली.

Well Collapsed In Mapusa

म्हापसा अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शेट्येवाडा, म्हापसा येथे एका घराशेजारील विहिरीची भिंत बुधवारी पहाटे कोसळली. भिंत कोसळून विहिरीच्या शेजारील जमीन खचली व तेथे पार्क केलेली दुचाकी क्रंमाक GA 07G 2900 विहिरीत कोसळली आहे.

जमीन खचल्याने घर देखील धोकादायक स्थितीत आले आहे. घराचा एक कोपरा जमीन खचलेल्या क्षेत्रात येत असल्याने सुरक्षात्मक उपाययोजना केली जात आहे. दरम्यान, म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रात्रभर पावसाची संततधार

गोव्यात मंगळवारी दिवसभर आधूनमधून पावसाचा जोरदार शिडकावा झाला. मंगळवारी रात्री पावसाचा जोर वाढला व रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली. तसेच, अनेक भागत घरे आणि झाडांची पडझड झाली.

दरम्यान, गोवा वेधशाळेने राज्यात पावसाबाबत आणखी दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 28 आणि 29 जून रोजी राज्यात काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT