sal Dainik Gomantak
गोवा

Sal News : साळ येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

Sal News : मुलांनी यावेळी फुगडी, नृत्य, घुमट आरती सादर केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sal News : साळ, विकसित भारत संकल्प यात्रेचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. सरपंच सावित्री घाडी यांनी श्रीफळ वाढवून तसेच आरती ओवाळून स्वागत केले. पंच नीता राऊत, मनु शिंदे यांनी औक्षण केले. जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी गटविकास अधिकारी ओमकार मांजरेकर, उपआरोग्य केंद्रातील डॉ. गौरीश नाईक व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. तसेच विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडीतील मुले व सेविका आदी उपस्थित होते.

पंचायत सचिव पुंडलिक गवस, शांबा घुरे, आनंद राऊत, सर्वेश चांदेलकर, शिवप्रसाद गवस, श्रावणी राऊत, दत्ताराम परब, विनया राऊत यांचीही उपस्थिती होती. सरपंच सावित्री घाडी, पंच नीता राऊत व मनु शिंदे यांनी मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. मुलांनी यावेळी फुगडी, नृत्य, घुमट आरती सादर केली.

यावेळी नाट्य कलाकार रामदास वरक, कर्तबगार महिला कीर्ती राऊत, शेतकरी विजय राऊत, विद्यार्थी जयेश राऊत यांचा शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवडकर, पंचायत परिसरातील प्लंबर, लाइनमन, कचरा व्यवस्थापनाची संबंधित कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच स्वस्त बालक स्पर्धेतील तीन यशस्वी मुलांना गुलाब पुष्पा देऊन गौरविण्यात आले. सरपंच सावित्री गाडी, पंच मनु शिंदे व नीता राऊत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली. प्रदीप रेवडकर यांच्या हस्ते पंचायतीला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सरपंच सावित्री गाडी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Climate Disasters in India: 80 हजार जणांचा मृत्यू, दोन दशकांत हवामान बदलांमुळे भारतावर मोठी आपत्ती; कॉप-30 मध्ये अहवाल सादर

Omkar Elephant: 'ओंकार' तात्पुरता 'वनतारा'मध्ये, कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय; उच्चस्तरीय समिती नेमणार

Delhi Blast: मुंबईसारख्या हल्ल्याचा कट दिल्लीत? इंडिया गेट, रेल्वे स्थानकं दहशतवाद्यांच्या रडारवर! लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर खुलासा

Cabinet Meeting Decision: कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आता 'PF', सात हजार जणांना लाभ मिळणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय

Pooja Naik: पूजाने सांगितलेल्या 'त्या' मंत्र्याचे नाव घेण्‍यास सरकार, पोलिसांचा नकार! 'FIR'वरून मुख्‍यमंत्री–पोलिसांकडून परस्‍परविरोधी वक्तव्‍ये

SCROLL FOR NEXT