Rain Update Dainik Gomantak
गोवा

Rain Update: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील काही भागात 12 ते 14 एप्रिल दरम्यान, पावसाची शक्यता आहे.

Pramod Yadav

Rain Update: हवामान खात्याने पुढील 5 दिवस गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील काही भागात 12 ते 14 एप्रिल दरम्यान, पावसाची शक्यता आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान गारपीटही होण्याचा अंदाज खात्याने वर्तवला आहे.

(IMD predicts rain for upcoming five days in Goa, Konkan And Parts Of Maharashtra)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी कोकण आणि 14 एप्रिल रोजी मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तसेच, त्यापुढील दोन दिवस देखील काही भागांत पाऊस हजेरी लावू शकतो असे खात्याने म्हटले आहे.

मागील काही दिवासांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर, गोव्यात देखील काही भागांमध्ये हलक्या सरींचा शिडकावा झाला. दरम्यान, पुढील पाच दिवस दोन्ही राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. असे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या विदर्भात देखील पाऊस पडू शकतो असे खात्याने नमूद केले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोकणात आणि गोव्यात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी काजुच्या बागांचे किरकोळ नुकसान झाल्याचे समोर आले होते.

हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT