Subhash Shirodkar|Goa News Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Disputes: कर्नाटक विरोधातील 'म्हादई'चे युद्ध आम्हीच जिंकू; जलस्त्रोत मंत्री शिरोडकर यांचा विश्वास

केंद्रीय जल आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार

Akshay Nirmale

Mahadayi Water Disputes: केंद्रीय जल आयोगाने म्हादई नदीच्या उपनद्या असलेल्या कळसा-भांडुरा या नद्यांचे पाणी वळविण्याच्या कामाच्या कर्नाटकच्या सुधारीत आराखड्याला मंजुरी दिली आहे. जल आयोगाच्या या निर्णयाचा गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी निषेध केला आहे. तसेच या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे.

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात दाद मागू. आमची बाजू मजबूत आहे आणि हे युद्ध आम्ही नक्कीच जिंकू.

दरम्यान, कळसा-भांडुरा योजनेचे काम न्यायालयाच्या स्थगितीमुळे काही काळापासून बंद आहे. म्हादईचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकने कायदे, नियमांची पायमल्ली सुरूच ठेवली होती. खरे तर म्हादईचे पाणी वळविणार नाही, असे आश्वासनही कर्नाटकने न्यायालयात दिले होते. कर्नाटकची ही दुटप्पी नीती आहे. कर्नाटकने नुकतेच म्हादई अभयारण्याजवळ मृदा तपासणी केली होती. विशेष म्हणजे त्यावर गोवा सरकारने कोणतीच कार्यवाही केली नव्हती.

दरम्यान, या मुद्यावर याबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले होते की, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासमवेत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेणार आहे. या भेटीत म्हादईचा प्रश्न मंत्र्यांना समजाऊन सांगणार आहे. गोव्याची भूमिका त्यांच्यासमोर मांडणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या निर्णयानंतर म्हादई या विषयावर पुढील धोरण ठरविण्यासाठी सोमवारी 2 जानेवारी रोजी मंत्रीमंडळाची विशेष बैठकही बोलावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

North Goa: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची खैर नाही! 66 जणांना ठोकल्या बेड्या; उत्तर गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

SCROLL FOR NEXT